महेंद्र महाजन जैन / रिसोड -
जिंतुर तालुक्यातील संक्राळा येथे पारंपरिक अनिष्ट रूढी परंपराना फाटा देत रविवार ९ एप्रिल रोजी आगळावेगळा शिवधर्म पद्धतीने सोहळा संपन्न झाला असून नव वधुवरांनी विवाह दरम्यान थोर महात्म्यांना मानवंदना करून आधुनिक विवाह सोहळयाचे थाटात संपन्न झाला.
अनिष्ट रूढी परंपराना झुगारून शिवधर्म पद्धतीने अंधश्रद्धा झुगारून विज्ञानवादी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन तालुक्यातील संक्राळा येथे शिवमती पुजा व शिवश्री विठ्ठल यांचा हा पारंपारीक पद्धतीने न करता शिवधर्म पद्धतीने संपन्न झाला.
या शिवविवाह सोहळ्यात अक्षदा ऐवजी फुले उधळून व पारंपारीक मंगल आष्टके झुगारून स्त्री भृण हत्या, बळीराजा यावर आधारित शिवाष्टके घेण्यात आली.
शिवभक्त गंगाधर महाराज कुरूंदकर यांच्या हस्ते हा शिवविवाह सोहळा संपन्न झाला. सुरवातीस राजमाता जिजाऊ, जगद्गुरू तुकाराम महाराज ,छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेच पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली व शिवविवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. या शिवविवाह सोहळ्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेतला व सर्कल प्रमुख अजित पवार ,दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवविवाह सोहळा संपन्न झाला. यापुढील विवाह हे अंधश्रद्धेला झुगारून शिवधर्म पद्धतीने साजरे केले जातील अशी ग्वाही संभाजी ब्रिगेड सर्कल प्रमुख अजित पवार यांनी दिली. या शिवविवाह सोहळयात संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे, शिवभक्त गंगाधर महाराज, जिल्हाअध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवाजीराव कदम, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष प्रभाकर लिखे, बालाजी शिंदे तालुकाअध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शहराध्यक्ष बाळासाहेब काजळे, गनेश पाटील ,मेघना बोर्डीकर, बाळु घुगे, राजेभाऊ घुगे आदिंची उपस्थीत होती. या शिवविवाहाचे परीसरात सर्वत्र कौतुक होत आहे. हा शिवविवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी राजेश पवार, अमोल पवार, भागवत पवार, अरून पवार व समस्त संभाजी ब्रिगेड मित्र मंडळीने व गावकरी मंडळीने सहकार्य केले
Wednesday, April 12, 2017
जिंतुर तालुक्यातील संक्राळा येथे अनोखा शिवविवाह - विवाह दरम्यान थोर महात्म्यांना दिली मानवंदना
Posted by vidarbha on 10:24:00 AM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment