महेन्द्र महाजन / सेनगाव:-
येथील जय गजानन मेडीकल वर औरंगाबाद येथील अन्न व औषधी भेसळ प्रतिबधक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या पथकाने छापा मारुन गर्भपात व नशा आननारा ९ लाख ५६ हजाराचा औषधी साठा जप्त करण्यात आल्याच्या घटनेने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात एकच खळबळ उडाली होती.
विदर्भा लगत असणार्या अतिदुर्गम भागात वसलेल्या सेनगांव तालुक्याच्या ठिकाणी एवढी मोठी घटना घडल्याची पहिलीच वेळ आहे. याप्रकरणी फरार आरोपी फोन वरून आपल्या इतर सहकारी मेडीकल धारकांना माल डिजाल करण्याच्या सुचना देत असल्याचे ही बोलल्या जात आहे. म्हैसाळ प्रकरणाची पुणावृती सेनगांव प्रकरणाने झाली आहे. अन्न व औषधी भेसळ अधिकारी व पोलीसांच्या संपुर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी धाडी सुरु आहेत आत्तापर्यंत अकोला, मानवत, परभणी, हिंगोली येथे धाडसत्र सुरु असल्याचे समजते. सेनगांव येथील आरोपी इंदोर येथुन खुराणा ट्रव्हल्सने हा माल हिंगोलीला आनुन तो माल हिंगोली मार्गे खाजगी वाहनाने सेनगांव येथे आनला जात असे. या आरोपीचा हा गोरख धंदा अकोला, परभणी. सांगली, सातारा पासुन पश्चिम महाराष्ट्रा पर्यंत पोहचला असल्याने आता फरार आरोपी माल देणार्या मेडीकल ग्राहकांना तो माल डिजाल करण्याच्या सुचना देत असल्याची माहीती अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख यांनी तेज न्युज हेडलाईन्स
प्रतिनीधीशी बोलतांना दिली. सेनगांव येथील मुख्य आरोपी पोलीसाच्या हातुन फरार होणे हि एक खेद जनक घटना आहे. लाखो चिमुकल्यांचे उमलण्या आधीच त्यांचा घात घेणार्या नराधमाला पोलीसांनी ताबडतोब अटक करून या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी ही देशमुख यांनी केली आहे. बीड येथील डाँ.मुंडेचे प्रकरण व हे प्रकरण तितकेच घातक असल्याचे ही त्यांनी सांगितले.
Wednesday, April 12, 2017
गर्भपाताच्या साठ्यासंबधी फरार आरोपीच्या सहकार्यांना माल डिजाल करण्याच्या सुचना
Posted by vidarbha on 10:26:00 AM in महेन्द्र महाजन / सेनगाव:- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment