महेन्द्र महाजन जैन / वाशिम-
वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे अकोला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मुकुंदराव दादा मेडशीकर यांचा मेडशी परिसरातील पहिलाच अमृत महोत्सव थोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मेडशी त सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली .अस्तपैलू व्यक्तिमत्वचे धनी मेडशीकर यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे जावई डॉ संजयराव सांगळे उद्योजक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मनमाड आणि त्यांची कन्या सौ मृणालिनी संजयराव सांगळे यांनी केले मुकुंदराव दादा मेडशीकर यांनी त्यांच्या हयातभर कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम केले त्यांची सामाजिक बांधिलकी भावना जोपासत परिसरातील सर्व पक्षीय नेते व कार्यकार्यानी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले. मुकुंदराव दादा मेडशीकर यांनी 75 वर्षात पदार्पण केले त्यानिमित्ताने येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .श्री नागनाथ माध्यमिक विद्यालयाच्या वतीने बुद्धिबळ स्पर्धा आणि योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. दि 10 एप्रिलला दादाच्या अमृत महोत्सवा निमित्त सकाळपासूनच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
सडा सारवण ,रांगोळ्या काढण्यात आल्या. दादाना उदंड आयुष्य लाभण्यासाठी त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात येऊन होमहवन करण्यात आला. कार्यक्रमस्थळी सर्वपक्षीय नेते ,कार्यकर्ते दादाच्या अमृत महोत्सवी एकत्र जमले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांची उपस्थिती लाभली .राज्याचे गृहराज्यमंत्री श्री रणजित पाटील यांनी मुकुंदराव दादाचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला. याप्रसंगी रणजित पाटील म्हणाले की मुकुंदराव दादा मेडशीकर अस्टपैलू व्यक्तिमतवाचे धनी आहेत .त्यानी सीमेवर देशाचे रक्षण केले तर समाज कार्य व राजकारण करून गरिबांना मदतीचा हात दिला. त्यांना भाकर दिली .कार्यकार्यताना मोठे करण्याचे काम केले. ते खऱ्या अर्थाने किंगमेकार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले .त्यांचे सहकारी माजी आमदार यांनी मैत्रीला उजाळा देत मुकुंदराव दादा एका वाघाचे नाव असून त्यानी कधी कोणाशी तडजोड केली नाही. स्वाभिमानाने जगात निर्णय घेतल्याने मी आमदार झालो. कधी पक्षपात ,जातीवाद केला नाही .दादा नी अजूनही मला मार्गदर्शन करावे दादा जेथे असतील तेथे मी जाईल असे म्हणत भारतीय जनता पार्टीत प्रवेशाचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले. माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर देवळे यांनी सांगितले की दादानी मला भाकर देऊन आमचे कुटुंब सावरले .दादा ने सैन्यात असताना देशसेवा केली समाज सेवा करण्याचे काम ते अविरत करत आहेत. दादाने सरपंच ते जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याची किमया साधली. चमत्काराचे दुसरे नाव दादा असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले . यावेळी माजी आमदार विजयराव जाधव,भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे ,भारतीय जनता पार्टी वरिस्ट नेते सुनील राजे,माजी सरपंच डॉ विवेक माने ,डॉ विजय सोनोने,माजी पंचायत समिती सदस्य गोपाल पाटील राऊत,आदींची समायोजित भाषणे झालीत यावेळी दादाच्या सहकारी व वृद्धांचा सत्कार करण्यात आला. श्री नागनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक व शिक्षक वृदानी दादांचा जंगी सत्कार केला कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य गोपाल पाटील राऊत ,भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष तानाजी पाटील काँग्रेस आमदार अमित झनक,माजी आमदार किसनराव गवळी ,गोपाल मानधने , माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर देवळे,भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव नितीन काळे , सरपंच रेखाताई मेटांगे,मीडिया प्रमुख महेश धाबे,संजय गांधी निराधार सदस्य अमोल माकोडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड दिलीप खेडकर,अभिजित मेडशीकर,आदींनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दादा चे पुत्र रणजित मेडशीकर यांनी करून आभार मानले
Wednesday, April 12, 2017
दादाचा अमृत महोत्सव थाटामाटात
Posted by vidarbha on 10:29:00 AM in महेन्द्र महाजन जैन / वाशिम- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment