महेंद्र महाजन जैन / रिसोड -
वाशीम - शहरातील जुने पोलीस क्वॉटर नजीक हनुमान मंदिरात 11 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खिराडे परिवारांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 6 वाजता हनुमानजीच्या मुर्तीचा अभिषेक व पुजाअर्चना करण्यात आली. त्यानंतर सकाळी 10 वाजतापासून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसरातील सर्व भाविक भक्त, नागरीक, महिला व बालकांनी या महाप्रसादाचा शिस्तीत लाभ घेतला. या महाप्रसादाच्या आयोजनासाठी बबनराव खिराडे, शंतनु खिराडे, उमेश भांदुर्गे, वासुदेव डाबेराव आदींसह परिसरातील युवकांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेवून महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी केला.
Tuesday, April 11, 2017
हनुमान जयंती निमित्त हजारोंनी घेतला महाप्रसादाचा
Posted by vidarbha on 7:48:00 PM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment