चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-
हैदोस, काठेवाड्याच्या वन चराईमूळे जंगलाचे मोठे नुकसान होत आहे.जंगले उजाड झाले तर त्याचा सरळ
फटका पावसाला बसतो. पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामूळे जंगलाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे
असे प्रतिपादन आ.प्रा.वीरेंद्र जगताप यांनी केले.
ते चांदूर रेल्वे वन परिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदूर रेल्वेचे नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती
वन विभागचे उपवनसंरक्षक हेंमत मीना, चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे अमरावतीचे
सहाय्यक वनसंरक्षक (कॅम्प/ वन्यजीव) आर.जी.बोंडे, सहाय्यक वनसरंक्षक (संरक्षा व अतिक्रमण निर्मुलन)
ए.डब्ल्यु.कविटकर,चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी

कार्यक्रमाची सुरूवात झाली. तर सर्व मान्यवरांचे पिंपळाचे रोपटं देऊन स्वागत करण्यात आले हे विशेष.
आमदार वीरेंद्र जगताप यांनी फित कापून चांदूर रेल्वे वन परिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
केले.यावेळी वनविभागाच्या वतीने वृक्षसंवर्धनाचे मोठे पोर्टेट आ.जगताप यांना भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना आ.जगताप म्हणाले, रोही,रानडुक्कर व माकड यांचा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या
त्रासामूळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येत आहे.वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केल्यास शेतात व गावागावात
वृक्षाची भरमसाठ वाढ होईल. जगात ३ टक्के पिण्याचे पाणी असुन त्यापैकी २ टक्के पाणी केवळ भारतात
आहे.विदर्भात आमच्या बापजाद्यांनी राखुन ठेवलेली जंगले नष्ट केली तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार
नाही.जंगले नष्ट झाल्याने हळुहळू पाऊस कमी पडेल व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल आणि
भविष्यात विदर्भाचा मराठवाडा व्हायला वेळ लागणार नाही. चिरोडी व पोहऱ्याचा जंगलात वाघ आहे. लोक
चिखलधरा येथे वाघ पाहण्यासाठी जातात तशी इथे गर्दी होऊन पर्यटनात वाढून रोजगार निर्मिती होईल असे
आ.जगताप यांनी सांगीतले. उपवनसंरक्षक हेंमत मीना यांनी चांदूर रेल्वे तालुक्यात जंगल वनसंपदेने नटलेले
आहे. अवैध वनचराई, आगीमूळे, काठेवाडी व मेंढपाळाच्या चराईमूळे जंगलाची वाढ खुंटल्याचे सांगीतले.
चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांनी जलसंवर्धन ही लोकचळवळ झाली पाहिजे असे
सांगीतले. यावेळी नगराध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे यांनी केले तर संचालन वनपाल
सदानंद पाचंगे व आभार प्रसाद वाकोडे यांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चांदूरवासीय व चांदूर
रेल्वे वन परिक्षेत्रातील वनकर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment