महेद्र महाजन जैन / रिसोड -
पाण्याच्या टंचाई ने होरपळत असलेल्या रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथिल प्लाटवाडीतिल सव्वाशे घरातिल परिवारांना आपल्या बोअरवेल ने मागील 6 वर्षापासून मोफत पाणि पुरवठा करत खरी जनसेवा करत असल्याने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
विदर्भ आनी मराठवाडा सिमेलगत असलेल्या कंकरवाडि गावाचि लोकसंख्या पाच हजाराच्या आसपास असून गाव चांगल्या मोठ्या क्षेत्रफळात वसलेला आहे.गावातील विहरी व हाथपंपाची पान्याची पातळी जानेवारी महिन्यातच खोलवर जाते,फेब्रुवारिच्या शेवटी तर यामध्ये ठनठनाट असतो.अश्यातच पान्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो.गावातिल नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते.
मात्र गावातिलच आपल्या छोट्याश्या किराना दुकान व वाहनाचे टायर पंम्चर चा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करनारे 35 वर्षीय शेख खाजा शेख वाहेद यांनी आपल्या मोहल्यातील प्लाटवाडी तिल महीला,लहानमुले,पुरुष यांची पाण्यासाठी होत असलेली वनवन पहावल्या गेलि नाही व त्यांनी आपल्या घरात बोअरवेल करुन त्यावर मोटरपंप बसवून कोनतेही शुल्क न घेता मागील सहा वर्षापासून दररोज सकाळी 5 वाजे पासून ते 11 वाजेपर्यंत पाणि देत आहेत.एव्हडेच नव्हे तर लग्न,शुभकार्य असो व दुखाच्यावेळी सुद्धा शेख खाजा आपला बोअरवेलचे पाणि आवर्जून उपलब्ध करून देतात.या भागात सर्व धर्माचे लोक आपसात मिसळून राहतात.शेख खाजा यांचेकडून होत असलेली सेवेबद्दल गावात कौतुक होत असून आपल्याला मिळत असेलेला पाणि यामुळे मोठे संकट टळाल्याने समाधान व्यक्त करित आहे.मात्र तरिही शासनाने पान्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे ध्यान देने गरजेचे आहे.
शेख खाजा
बोअरवेल धारक
कंकरवाडी
६ वर्षापुर्वी मि आपल्या घरात मोफत पाणी वाटून या नियतीने बोअरवेल करून घेतले. अल्लाहच्या कृपेने १७० फुट अंतरावर भरपूर पाणि लागले.त्या दिवसापासून आजरोजी पर्यंत मोहल्यातील लोकं पानी नेत आहेत.6/7 तास मोटर पंप सुरु राहुन सुद्धा पान्याची धार कमी होत नाही.बोअरवेलला एवढ्या मोठ्या प्रमानात असलेल पानि हा मोहल्यातील नागरिकांच्या नशिबाच पानी आहे असा माझा समज आहे.
..........................................................................................................................................
दीपाली डिगांबर महामुनि
कंकरवाडी
शेख खाजा यांनी आम्हा सर्वाना 6 वर्षापासून पानी देत खुप मोठा आधार दिला आहे.दरवर्षी पावसाची सरासरी कमी होत आहे.फेब्रुवारी ते जून पर्यंत पान्याचा सर्वात मोठा व गंभीर प्रश्न शेख खाजा याच्यामुळे आमच्या प्लाटवाडीतील सव्वाशे घरांच्या परिवारातिल सुटला आहे. मात्र तरिही शासनाने उपाय योजना करने गरजेचे आहे.
Post a Comment