चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा सचिवांसह अनेक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांना कुठलाही त्रास न देता तुर लवकरात लवकर मोजण्याचे आदेश देण्याची मागणी सोमवारी उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे यांना करण्यात आली. याची तत्काळ दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी नाफेडच्या वरीष्ठांसोबत संपर्क करून लवकरात लवकर तुर मोजणीचे नाफेड अधिकारी यांना आदेश दिले. यासोबतच सीआरपीसी फौजदारी प्रकीया संहीता 1973 च्या कायदा अन्वये तहसिलदार यांच्या मार्फत नाफेडला नोटीस बजावण्याचे आदेशही उपविभागीय अधिकारी यांनी दिले.
चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डिसेंबर २०१६ पासुन नाफेडने तुर खरेदी सुरू केली. वास्तविक पाहता डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांची तुरी शेतातच उभी असते. त्यामुळे त्या काळात सगळ्या व्यापाऱ्यांनी आपली तुर नाफेडला दिली. त्यामध्ये नाफेड अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे सगळीच तुर क्वॉलीटी न पाहता खरेदी करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आता जेव्हा कास्तकाराची तुर बाजार समितीत आली तर मधेच 'गोडाऊन हाऊसफुल्ल'चे कारण देत तुर खरेदी बंद केली होती. त्यामुळे बाजार समितीच्या मोकळ्या जागेवरच शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तुर उन्हाचा तडाखा सहन करीत मागिल एक ते दीड महिन्यांपासुन पडुन आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या तुरीचे पोते उन्हामुळे फुटुन ते माती सोबत मिश्रीत झाले. तसेच उन्हामुळे ही तुर काळीसुध्दा पडुन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र नाफेड अधिकाऱ्यांना त्याचे काहीच घेणेदेने नसल्याचे दिसते. याउलट दिवसभर शेतकऱ्यांना चाळणी मारायला लावुन संध्याकाळी तीच तुर रीजेक्ट करण्याचा प्रकार नाफेडने चालवला असला तरी बाजार समिती सभापती व सचिवांचेही काहीही एैकायला तयार नाही. अखेर सोमवारी सभापती प्रभाकरराव वाघ, सचिव चेतन इंगळेसह अनेक शेतकरी उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात पोहचले. व या संपुर्ण प्रकाराबाबत उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे यांना माहिती दिली. याची लगेच दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी नाफोडच्या वरीष्ठांशी फोनवर सविस्तर चर्चा केली. व लवकरात लवकर शेतकऱ्यांची तुर त्रास न देता मोजनी करण्याचे आदेश दिले. यासोबतच नाफेड अधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्याचे आदेश तहसिलदारांना दिले. यामुळे आता कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकाऱ्यांच्या या आदेशाचे नाफेडचे अधिकारी किती पालन करणार हे येणारा काळच सांगेल.
Monday, April 17, 2017
नाफेड अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी धडकले एसडीओ कार्यालयात - एसडीओंचे तहसिलदारांमार्फत दिले नाफेडला नोटीस बजावण्याचे आदेश तसेच तत्काळ तुर मोजणीचे नाफेड अधिकारी यांना आदेश
Posted by vidarbha on 9:00:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment