सध्या पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांच्या इतर समस्या, पत्रकारांचे संघटन वाढविणे, ग्रामिण पत्रकारांना अधिस्विकृतीचा लाभ मिळणे अशा एक ना अनेक समस्या पत्रकारांच्या असुन या करीता अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटना संपुर्ण महाराष्ट्रात जोमाने कार्य करीत आहे. या संघटनेव्दारा अनेक पत्रकारांना न्याय मिळवून दिल्या जात असुन लोगोपयोगी कार्य ही संघटना सतत करीत आहे. या संघटनेत सातत्याने कार्य करणाऱ्या पत्रकारांची दखल घेवुन त्यांचा मान त्यांना दिला जातो. म्हणुनच स्थानिक पत्रकार युसुफ खान यासीन खान यांना १६ एप्रील रोजी जळगाव येथे आयोजीत अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या अधिवेशनात नवरत्न दर्पन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे एकदिवसीय अधिवेशनाचे रविवारी जळगाव येथील कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळच्या सञात शाहीर शिवाजी पाटील यांनी गायलेल्या पोवाड्यानी पञकाराची मने जिंकली. यावंतर दुपारी १२ वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. उद्घाटन संपन्न झाल्यावर काही जेष्ठ पत्रकारांनी आपले विचार व्यक्त केले. यानंतर सायंकाळच्या सञात संपुर्ण महाराष्ट्रातुन आलेल्या व आपल्या लेखनीतुन समाजाचे ज्वलंत प्रश्न मांडून न्याय मिळवून दिला अशा जवळपास ५५ पत्रकारांना नवरत्न दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्येच चांदूर रेल्वे येथील पञकारांनी लिखानासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजुर यांच्या परीवारांना आधार म्हणुन विविध समाज उपयोगी कार्य केले. यामुळेच शहरातील जेष्ठ पत्रकार युसुफ खान यांना जळगाव येथील खासदार ए.टी. नाना पाटील यांच्याहस्ते नवरत्न दर्पन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय अध्यक्ष मधूसुदन कुलथे, अशोक पवार तसेच जळगाव येथील विविध दैनिकांचे आवृत्ती प्रमुख उपस्थित होते.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे शहरातील जेष्ठ पत्रकार प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, धिरज नेवारे, सचिव प्रा. रविंद्र मेंढे, कोषाध्यक्ष मनिष खुने, जिल्हा निरीक्षक बाळासाहेब सोरगिवकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल गवळी, संजय मोटवानी, विवेक राऊत, अभिजीत तिवारी, मंगेश बोबडे, इरफान पठान, मंगेश बोबडे, शहेजाद खान, मधुकर बावने, अमर घटारे, प्रा. सुधिर तायडे, विनय गोटेफोडे, राहुल देशमुख, प्रा. प्रसेनजित तेलंग, अजय गावंडे, हनुमंत मेश्राम, राजेश सराफी, सुभाष कोटेचा आदींनी कौतुक केले असुन असंख्य मित्र मंडळी फोन वरून व प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा देत आहे.
Post a Comment