Monday, April 17, 2017
सेनगांवच्या भावना खाडे ची महाराष्ट्र सिनियर महिला हाँकी टिममध्ये निवड
Posted by vidarbha on 8:00:00 AM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड -
सेनगांव:- शहरातील प्रसिध्द व्यापारी सतिष खाडे यांची कन्या भावना खाडे हिची राष्ट्रीय हाँकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सिनियर महिला हाँकी टिममध्ये निवड झाली आहे ह्या स्पर्धा दि.२० एप्रिल २०१७ ते २५ एप्रिल २०१७ ला रोहतक (हरीयाणा) येथे होणार आहेत.
क्रिडा प्रबोधनीत मिळालेल्या प्रवेशाच्या संधीचे सोने करीत हाँकी खेळात उल्लेखनीय कामगिरी करुन सेनगांवच्या भावना खाडे हिने राज्य, देशपातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. माघील सात वर्षात तिचा यशाचा आलेख चढताच राहीला सेनगांव सारख्या दुर्गम भागातील मुलगी वयाच्या १६ व्या वर्षी क्रिडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करु शकते हि तिने दाखवुन दिले. इयत्ता चौथी पर्यंत सेनगांव येथील जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेणार्या भावना खाडे हिने क्रीडा प्रबोधनीत प्रवेश मिेळवला शालेय वयापासुन हाँकीमध्ये करीअर करण्याचा चंग बांधलेल्या भावना खाडे हिने पुणे येथील प्रसिध्द हाँकीपटु अजित लाकरा व कोच आरती हळगली यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर जिल्हास्तरापासुन राज्य व देश पातळीवर यशस्वीपणे मजल मारली आहे. याच उल्लेखनिय कार्याच्या जोरावर भावना खाडे हिची राष्ट्रीय हाँकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सिनियर महिला हाँकी टिममध्ये निवड झाली आहे. यापुर्वी भावना खाडे हिने २०१४ च्या चार राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनीधीत्व केले आहे. जवाहरलाल नेहरु हाँकी स्पर्धेत १९ वर्षाखालील संघात संघ व कर्णधार म्हणुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. कर्नाटक चित्रदुर्ग येथे झालेल्या महिलांच्या खुल्या हाँकी संघात प्रतिनिधीत्व केले तर दिल्ली येथील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत १९ वर्षाखालील संघाचे कर्णधार पद भुषविले आहे. पुर्वी भावना खाडे हिची २०१० मध्ये १४ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. पंजाब येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला त्यानंतर हरियाणा येथील राष्ट्रीय स्पर्धात प्रतिनीधीत्व केले तर २०१३ मध्ये राष्ट्रीय हाँकी स्पर्धेत महाराष्ट्र सब ज्युनियर हाँकी संघाचे कर्णधार पद भुषवित उपविजेते पद मिळविले. भावना हिला बेस्ट मिड प्लेयर आँफ द टुर्नामेंट ( नेहरु कप पुणे), बेस्ट प्लेयर आँफ द टुर्नामेंट ( जैन चषक जळगांव) हे महत्वाचे पुरस्कार मिळालेत भावना सध्या बि.काँम च्या प्रथम वर्षात पुणे येथील माँर्डन काँलेजला शिकत आहे. तिच्या या यशाबद्दल वडील सतिष खाडे तेज न्युज हेडलाईन्स च्या प्रतिनीधीशी म्हणाले की, मुलीची प्रगती बघुन मला खुप आनंद होत आहे माझी मुलगी भावना हिने देशाचे नाव जगाच्या नकाशावर उंचवावे हिच अपेक्षा असल्याचे सांगितले. भावना खाडे हिची राष्ट्रीय हाँकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सिनियर महिला हाँकी टिममध्ये निवड झाल्याने सेनगांव तालुक्यातुन अंभिनंदन होत आहे. भावना खाडे हिचे तेज न्युज हेडलाईन्स च्या वतीनेसुध्दा खुप खुप अभिनंदन व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment