Monday, April 17, 2017
आमदार साहेबांना आली जाग... सेनगांव पं.स.मध्ये पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन
Posted by vidarbha on 8:00:00 AM in महेंद्र महाजन / रिसोड | Comments : 0
महेंद्र महाजन / रिसोड
सेनगांव:- सेनगांव पंचायत समिती मध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यात आमदारांच्या प्रमुख उपस्थित तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात येते यावर्षी मात्र एप्रिल महिना चालु असतांना ही ही बैठक न झाल्याने भाजपा चे आ.तान्हाजीराव मुटकुळे यांना पाणीटंचाई आढावा बैठकीचा विसर पडला अश्या मतळ्याखाली तेज न्युज हेडलाईन्स ला बातमी झळकताच आमदार साहेबांना आली जाग. सेनगांव तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७ एप्रिल सोमवार रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती मध्ये होणार आहे.
सेनगांव तालुक्यात यावर्षी कमालीचे तापमान वाढल्याने विहीरी, बोअर, हातपंप, व ईतर पाणीपुरवठ्याचे स्त्रोत आटल्याने तालुक्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हि बैठक जानेवारी महिन्यातच घ्यायला हवी होती आता एप्रिल महीना संपत आला असुन पावसाळा सुरु होण्यास दिडच महिनाचा कालावधी आहे या पाणीटंचाई आढावा बैठकीचा आढावा कधी निघणार व पाणी नियोजन केव्हा होणार असा भाबडा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला असावा. या बैठकीत माघील अपुर्ण राहीलेल्या पाणीपुरवठा योजनेबद्दल वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. पेयजल योजना, जलस्वराज्य योजना, भारत निर्माण आदी लाखो रुपये खर्चुन काही गावातील योजनेचा खर्च पाण्यात गेला आहे. याविषयासह हातपंप दुरुस्ती, बोअर अधिग्रहणासह विविध पाणीटंचाई वरील मुद्यावर या बैठकीत १३३ गावच्या पाणीटंचाई संदर्भात सविस्तर चर्चा रंगणार आहे. या बैठकीला सेनगांव तहसिलदार वैशाली पाटील, सेनगांव पं.स. चे गटविकास अधिकारी ढवळशंख आदीसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत राहणार आहेत. सर्व ग्रामसेवक व सरपंचानी उपस्थित राहण्याचे आवाहन सेनगांव पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment