महेंद्र महाजन जैन / वाशिम-
वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला ,उपविभागीय कार्यालयासह 6 पोलीस स्टेशनला आयएसओ दर्जा प्राप्त झाला असून
अमरावती परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या संकल्पनेतून वाशिम जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालून गुन्ह्याचा छडा त्वरित लावण्यासाठी आज वाशिम येथील पोलीस मुख्यालयात सायबर लॅबचे उद्घाटन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ विठ्लराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर,अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, उपविभागीय अधिकारी जय कुमार चक्रे , पत्रकार अजय ढवळे, समाजसेवक वसंतराव धाडवे, दौलतराव हिवराळे यांच्या सह जिल्हा शांतता समिती सदस्य,पोलीस मित्र व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या कार्यकाळात पोलिसांची प्रतिमा उंचावली असून गुन्हेगारी ला आळा बसला आहे जिल्ह्यातील 7 पोलीस स्टेशनला आयएसओ दर्जा प्राप्त झाला असून महाराष्ट्रात वाशिम पोलीस दलाची मान उंचावली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर , अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी कर्तव्य दक्षतेची चुणूक दाखवत कार्यालयातील व ठाण्यातील नवीन संगणक ,नवीन फाईल,कपात,टेबल,इतर साहित्यासह रेकॉर्ड अद्यावत केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला आयएसओ दर्जा प्राप्त झाला आहे
Monday, April 17, 2017
वाशिम पोलीस अधीक्षक कार्यालयाला आयएसओ दर्जा
Posted by vidarbha on 8:02:00 AM in महेंद्र महाजन जैन / वाशिम- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment