BREAKING NEWS

Saturday, April 1, 2017

*सेवानीवृत्त पि.एन.सुरपाटणे यांचा निरोप समारंभ संपन्न*


अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-




शासकीय कर्मचारी वयाचे 58 वर्षे पूर्ण झाली की नियमानुसार सेवानीवृत्त होतो.सेवेत सोबत इतकी वर्षे राहिलेला व्यक्ती निवृत्ती नंतर आपल्या सहका-यांना सोडून जातो तेव्हा सहाजिकच भावनेचे बांध फुटतात.स्थानीक राष्ट्रीय विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पि.एन.सुरपाटणे यांच्या सेवानीवृती नतंर त्यांना त्यांचे सहकारी यांनी भावनिक निरोप एका कार्यक्रमात दिला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक प्रमोद नैकेले यांचे अध्यक्षतेखाली व उपमुख्याध्यापक सुनिल झंवर,पर्यवेक्षक ममता तीवारी,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरीश पुरोहित व मिनाताई सुरपाटणे यांचे प्रमुख उपस्थितीत सुरपाटणेसर यांना शालश्रिफळ व भेटवस्तू देऊन अध्यक्षांचे हस्ते सत्कार करण्यात आला जेष्ठ शिक्षिका राधिका बैस यांनी खननारळ देवून मीनाताई यांचा सत्कार केला याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलतांना पि.एस.नैकेले यांनी सुरपाटणे सर यांचे बद्दल माहिती देतांना सांगितले की त्यांनी आपल्या सेवेला 1988 मध्ये सुरवात केली व 31 मार्च 2017 ला सेवानीवृत्त झाले अचानक त्यांचा मागील सप्टेंबरला अपघात झाला त्यामुळे आज ते आपल्या भावना व्यक्त करू शकत आज त्यांना निरोप देतांना आम्हाला दुख: होत आहे की ते या परिस्थितीत निवृत्त झाले त्यांना एक मुलगा असून तो अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे मुलगी 8 वीत शिकत आहे आणि अपघातात डोक्याला मार लागल्याने सर या परिस्थितीत आहे त्यांची व दोन मुलांची जबाबदारी त्यांच्या पत्नी मीनाताई सुरपाटणे यांचेवर आहे परमेश्वर त्यांना शक्ती प्रदान करो व सुरपाटणेसर लवकर आजारपणातून चांगले होवो अशी प्रार्थना केली कार्यक्रमाचे संचलन महेश शेरेकर तर आभारप्रर्दशन झंवरसर यांनी केले.कार्यक्रमाला प्रमोद सुरपाटणे,अमोल काशीकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.