BREAKING NEWS

Wednesday, April 26, 2017

हिंदु आतंकवादाचे षड्यंत्र उघड झाले ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था



तब्बल साडेआठ वर्षांनंतर साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन मिळाला. आजचा दिवस अत्यंत आनंददायी आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने साध्वींच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे सांगितल्यावरही त्यांना जामीन मिळवण्यासाठी इतका काळ कारागृहात व्यतीत करावा लागणे, हे दुर्दैवी आहे. धर्म-अधर्माच्या लढ्यातील हा धर्माचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी व्यक्त केली आहे.
मुसलमान आतंकवादी सापडल्यावर कधी हिरवा आतंकवाद वा इस्लामी आतंकवाद असे न म्हणणार्‍या हिंदुद्रोह्यांनी हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी खोटे पुरावे गोळा केले, हिंदु संतांना नाहक अपकीर्त (बदनाम) केले आणि अस्तित्वात नसलेला हिंदु आतंकवाद निर्माण केला. आज हिंदु आतंकवादाचे षड्यंत्र रचणार्‍या लोकांचा बुरखा फाटला आहे. साध्वींना आज केवळ जामीनच मिळाला आहे; पण लवकरच त्या निर्दोष मुक्त होतील, अशी आमची भगवंतावर श्रद्धा आहे, असेही श्री. अभय वर्तक यांनी म्हटले आहे.
हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांना अपकीर्त करण्याचे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच कार्यरत आहे. हिंदु आतंकवादाचा उगम हा याच कटाचा भाग आहे. काही दिवसांपूर्वी स्वामी असिमानंद यांची सुटका झाली, आता साध्वीजींची सुटका होत आहे. लवकरच हिंदु संतांवर चिखलफेक करण्याचे षड्यंत्र उघड होईल, अशी आम्हाला खात्री आहे. साध्वीजींना मिळालेल्या जामिनाचा आम्हाला आनंद आहेच; पण जेव्हा त्यांना या षड्यंत्रात जाणीवपूर्वक गोवणार्‍या संबंधित हिंदुद्रोह्यांना शिक्षा होईल, तेव्हा खर्‍या अर्थाने आनंद होईल, असे श्री. वर्तक यांनी म्हटले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.