Wednesday, April 26, 2017
साध्वींना जामीन मिळणे, हा भाजप शासन आल्यामुळे झालेला पालट नाही, तसेच एन्आयएनेही कोणतेही उपकार केलेले नाहीत ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद
Posted by vidarbha on 6:57:00 AM in | Comments : 0
साध्वींना वर्ष २००८ मध्ये अटक केल्यावर ६ मासांतच त्या निर्दोष असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. या प्रकरणातील साक्षीदार बैरागी, दिलीप नहार, यशपाल बधाना, नितीन जोशी आणि अन्य जणांनी त्याविषयी तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यामुळे हा जामीन म्हणजे भाजप शासन आल्याने झालेला पालट नाही किंवा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेनेही परिस्थिती पालटलेली नाही. तसेच यंत्रणेने कोणतेही उपकार केलेले नाहीत. जे साक्षीदार गेली ८ वर्षे सांगत आहेत, तेच न्यायालयापुढे आता मांडले गेले आहे. जामीन दिला नसता, तरी पुढे न्यायालयात खटला चालल्यावर साध्वी निर्दोष सुटल्याच असत्या. वर्ष २००९ मध्ये मनमोहन सिंह हे काँग्रेस सरकारमध्ये पंतप्रधान असतांना त्यांच्या काळात साक्षीदारांच्या साक्षी राजकीय दबावामुळेे नोंदवल्या गेल्या नव्हत्या. हा न्याययंत्रणेचा पराभव असून साध्वींवर झालेल्या अन्यायाची हानीभरपाई कोण भरून देणार, हा खरा प्रश्न आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment