मुंबई उच्च न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन संमत केला आणि देशभरातील हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला. हा आनंद साजरा करत असतांना गेली साडेआठ वर्षे कोणत्याही पुराव्याशिवाय साध्वींना कारावास भोगावा लागला, याविषयी दुःखही आहे. इमाम बुखारींसारख्यांवर अनेक अजामीनपात्र गुन्हे प्रविष्ट असतांना केवळ मुसलमान म्हणून त्यांना साधी अटकही होत नाही आणि दुसरीकडे एक हिंदु संत म्हणून साध्वींना साडेआठ वर्षे कारावास मिळतो, हा हिंदूंवरील अन्यायच आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता
श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
हिंदु संतांची अपकीर्ती करणे, हा हिंदुद्रोह्यांच्या षड्यंत्राचाच भाग होता. कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती, स्वामी असिमानंद आदींवर खोटे आरोप करून अटक करण्यात आली आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्याचप्रकारे साध्वींनाही खोट्या आरोपांखाली अटक करून २५ एप्रिलला जामिनावर मुक्त करण्यात आले. त्या उद्या निर्दोष मुक्तही होतील, यामध्ये आम्हाला शंका नाही; मात्र ज्यांनी साध्वीजींवर खोटे आरोप केले, खोटे पुरावे निर्माण करून त्यांना अडकवले, त्या सर्वांवर जेव्हा कारवाई होईल, तेव्हा खर्या अर्थाने न्याय मिळेल, असे श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.
Post a Comment