BREAKING NEWS

Wednesday, April 26, 2017

शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जमुक्त केले पाहिजे – श्री उद्धव ठाकरे


 समान कर असेल तर दर पण समान असले पाहिजे

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राज्यात शेतकऱ्यांची अवस्था वाईट असून, शेतकरी परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे. शिवसेनेची मागणी आहे शेतकऱ्यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केले पाहिजे. असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला, आणि तूर संदर्भातला निर्णय घ्यायला भाग पाडले. हा पवित्रा शेतकऱ्यांसाठी घेतला, मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला, त्यांचे धन्यवाद देतो. आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यांसाठी मदत द्या, अशी बातमी वाचली, एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नये. अशी सूचना ठाकरे यांनी केली. जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, डिझेल भाव खाली आले, तरी आपल्या देशात दर खाली आले नाही. माझी अपेक्षा आहे जर समान कर लावणार असू तर देशभरात दर पण समान असायला हवेत. इतर राज्यात आपल्या सोयीने दर लावतात, त्यामुळे दरवाढ होते, समान कर असेल तर दर पण समान असले पाहिजे असे ठाकरे म्हणाले. मुंबईत सगळ्यात जास्त दराने पेट्रोल विकल जात असेल तर ते चूक आहे. मोहन भागवत मनापासून राष्ट्रपती पदासाठी सुचवले आहे. शरद पवारांच्या बाबतीत म्हणायचे तर ते मोदींचे गुरू आहेत, असे मोदींनी सांगितले त्यांना पद्मविभूषण दिले. मला माहित नाही कुणाच्या मनात काय येईल. एकमेकांची मन जाणून घ्यायला तेवढी जवळीक लागते. अनेक वर्षांनी पहिल्यांदा एक हाती सत्ता आली आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको असे सांगत भागवत यांच्या नावाची पसंती दर्शवली. प्रश्न-हिंदुराष्ट्र संकल्पने साठी भागवत हेच लायक असतील का ? यावर ठाकरे म्हणाले की, का नसावेत, इतर राज्यपाल निवडणूक पहा, इतरत्र ठिकाणी आर. एस. एस कार्यकर्त्यांची नेमणूक करतो मग देशाचे नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे सांगितले. काश्मीर शांत होत नाही छत्तीसगढ मध्ये हल्ला झाला, तुम्हाला वाटेल मी कुत्सुतेने बोलतोय, गोवंश हत्याबंदी कायदा काही राज्यात झाला, काही राज्यात होत नाही त्यामुळे त्याचा परिणाम होत नाही असे  बोलले जाते. मग काश्मीर , छत्तीसगढ मध्ये नोटबंदी झाली नसेल कदाचित असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे आणि राहील. तुरीचा प्रश्न इतके ताणले जाण्याची गरज नव्हती. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच पटकन दखल सरकारने घेतली पाहिजे, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही असा कारभार केला पाहिजे, मला तशी अपेक्षा आहे असे उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला बजावले. नारायण राणे भाजपा प्रवेशाबाबत बोलणार नाही, त्या दोघांनाही शुभेच्छा. शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार यावर आमची आणि त्यांची चर्चाच नाही झाली तर तुम्हाला काय सांगू असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.