BREAKING NEWS

Tuesday, April 25, 2017

आदी शंकराचार्य जयंती महोत्सवाची शहरात जय्यत तयारी

महेन्द्र महाजन जैन / रिसोड



वाशीम - सर्वधर्मीय बांधव व सामाजीक संघटनंाच्या सहभागातून शहरात येत्या 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता स्थानिक सिव्हील लाईन परिसरातील पोलीस ग्राऊंड मैदानात श्रुतीसागर आश्रम ङ्गुलगाव जि. पुणे यांच्या आयोजनातून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आदी शंकराचार्य यांच्या भव्य दिव्य जयंती महोत्सवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून न भूतो न भविष्यती असा वाशीममध्ये साजरा होणार्‍या या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्वधर्मीय समाजबांधव अथक परिश्रम घेत असल्याची माहिती या जयंती कार्यक्रमाचे संयोजक ऍड. विजय जाधव यांनी रविवार, 23 एप्रिल रोजी सर्कीट हाऊस येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये दिली. सोबतच हा जयंती महोत्सव ग्रामोत्सव म्हणून साजरा होण्यासोबतच सर्व धर्मीय बांधवांनी या जयंती महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जाधव यांनी यावेळी केले.
    पत्रकार परिषदेत जाधव जयंती महोत्सवाची रुपरेषा विषद केली. कार्यक़्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर श्रुतीसागर आश्रमाचे संस्थापक परमपुज्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे आशिर्वचन व परमपुज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांचा दिव्य संदेश ऐकायला मिळणार आहे. या महोत्सवात मध्यप्रदेश राज्यातील बडवाह येथील श्रीराम महाराज यांना आदी शंकराचार्य पुरस्कार व सोलापुर येथील वेद शास्त्र संपन्न चैतन्य नारायण काळे यांना वेदसंवर्धन पुरस्कार देवून सन्मानित केल्या जाईल. यावेळी पोहरादेवीचे पुज्य राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज, इंदौरचे संत बाबा महाराज तराणेकर, वाशीमचे विजयकाका पोफळी महाराज यांची विशेष उपस्थिती राहील. तर गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, पालकमंत्री संजय राठोड, सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे, शिक्षणतज्ञ डॉ. मो.म. गोसावी यांची प्रमुख उपस्थिती राहील.
    या कार्यक़्रमासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून त्यामध्ये संचलन समिती, प्रचार व प्रसिध्दी समिती, निवास समिती, स्वागत कमान समिती, मैदान बैठक समिती, भोजन नाश्ता समिती, यातायात समिती, निमंत्रण समिती, पाणीपुरवठा समिती, स्वच्छता समिती, कार्यालय समिती, शहर सजावट समिती, पार्कीग समिती, कार्यक्रम परिसर सजावट समिती, सुरक्षा समिती, शोभायात्रा समिती, संत महंत सेवा समिती, प्रसाद वितरण समिती, गायन संगीत मंत्र समिती, हार फुले पुष्पगुच्छ समिती, विद्युत ध्वनी समिती, आरोग्य समिती, स्मरणिका समिती, विविध परवानगी समिती, महिला समिती आदी समित्या गठीत करुन त्यांना कामे नेमून दिलेली आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमाता अमृतानंदमयी सत्संग समिती, पतंजली योग समिती, गायत्री परिवार, योग वेदांत समिती, सुर्योदय परिवार, सहेली उद्योजक मंडळ, बजरंगबली हिंदु आखाडा मंडळ, वारकरी संप्रदाय व भजनी मंडळ, श्री स्वामी समर्थ आध्यात्मीक विकास मंडळ, पंचशिल विद्यालंकार शिक्षण संस्था, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, बालासाहेब व्यायाम प्रसारक मंडळ, दुर्गा विसर्जन मंडळ, व्यापारी व युवा व्यापारी मंडळ, वाशीम जिल्हा केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशन, इंडियन मेडीकल असोसिएशन, वाशीम शहर विविध महिला भजनी मंडळ, व्यंकटेश सेवा समिती, वाशीम सायकलस्वार ग्रुप, परशुराम ब्राम्हण संघ, श्री सत्यसाई सेवा समिती, आर्ट ऑङ्ग लिव्हींग परिवार, समर्थ अकॅडमी, संत निरंकारी मंडळ, मारवाडी युवा मंच, माळी युवा मंच, गणेश विसर्जन समिती, सद्गुरु परिवार, छावा संघटना, लोकमत सखी मंच, जेसीआय, समर्थ सेवा मंडळ, सिंधी समाज मंडळ, विधिज्ञ मंडळ, वैद्यकिय विकास मंच, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, जनजागरण मंच, हिंदवी परिवार, दिगंबर जैन सोशल ग्रुप आदी विविध संघटनांचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
    या जयंती महोत्सवाबद्दल अधिक माहिती देतांना ऍड. विजय जाधव म्हणाले की, हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. सर्व जातीपंथ, समाज, संघटना यासाठी स्वत:हून परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमांतर्गत स्वामीजी व माताजी 28 एप्रिल रोजी वाशीम येथे तिरुपती सिटी येथे येतील. त्यावेळी त्याचे पाद्यपुजन व स्वागत केले जाईल. 29 एप्रिल रोजी शोभायात्रेदरम्यान शहरातील सर्व थोर महापुरुषांच्या पुतळ्याचे पुजन केले जाईल. मुख्य कार्यक्रम 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुरु होणार असून मोहन भागवत यांचे आगमन त्याच दिवशी दुपारी वाशीममध्ये होईल. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्र्यांसोबत विभागातील सर्व आजी माजी खासदार, आमदार, नगराध्यक्ष यांची मंचावर बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ना. भाऊसाहेब फुंडकर व आमदार राजेंद्र पाटणी यांनीही या कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी जयंती महोत्सवाच्या व्यंकटेश कॉलनी स्थित कार्यालयाला भेट दिली आहे. या कार्यक्रमाला जनतेतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून हा जयंती महोत्सव खर्‍या अर्थाने वाशीमचा ग्रामोत्सव साजरा व्हावा अशी अपेक्षा यावेळी संयोजक ऍड. विजय जाधव यांनी व्यक्त केली. पत्र परिषदेला प्रा.दिलीप जोशी व धनंजय रणखांब यांची उपस्थिती होती.
-----------------------------------------------------------

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.