जिल्हा प्रतिनिधी / वाशिम
महेंद्र महाजन जैन / रिसोड -
रिसोड पंचायत समितीच्या सभापती म्हणून भाजपा च्या सौ छायाताई सुनील पाटील यांची अविरोध निवड झाली असून शिवसेनेचे महादेवराव ठाकरे हे देखील अविरोध उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत. रिसोड पंचायत समिती सभापती प्रशांत खराटे व उपसभापती विनोद नरवाडे यांचेवर पंचायत समितीच्या १२ सदस्यांनी अविश्वास ठराव पारित करून १८ एप्रिल २०१७ रोजी त्यांची पदे रिक्त केली होती.यामध्ये भाजपाच्या ६ व शिवसेनेच्या ६ सदस्यांचा समावेश होता.सभापती व उपसभापतींची पदे रिक्त झाल्याने मंगळवार २५ एप्रिल २०१७ रोजी सभापती व उपसभापती या दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.सभापती पदासाठी भाजपाच्या सौ छायाताई सुनील पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता तर उपसभापती म्हणून शिवसेनेचे महादेवराव ठाकरे यांचाही एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सभापती म्हणून भाजपाच्या सौ.छायाताई सुनील पाटील व उपसभापती म्हणून सेनेचे महादेवराव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी क्रांती डोंबे यांनी घोषित केले.निवडणूक प्रक्रियेदरम्यान सभागृहामध्ये १८ पैकी १३ सदस्य उपस्थित होते यामध्ये सौ.छायाताई पाटील,विनोद नरवाडे,गजानन बाजड,सौ.शारदाताई आरु,सौ.कावेरीताई अवचार,नागोराव गव्हाळे,सौ.ज्योतिताई मोरे,महादेवराव ठाकरे,सौ.यशोदाताई भाग्यवंत,सौ.चंद्रकलाताई बांगरे,श्रीकांत कोरडे,केशव घुगे व सौ.कमलताई करंगे यांचा समावेश होता.सभापती पदी सौ.छायाताई सुनील पाटील ह्या दुसऱ्यांदा विराजमान झाल्या तर उपसभापती पदाची माळ महादेवराव ठाकरे यांच्या गळ्यात तिसऱ्यांदा पडली आहे.सभापती व उपसभापती यांच्या निवडीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता.निवडी नंतर पंचायत समिती निवासस्थान परिसरात सभापती व उपसभापती यांचा सत्कार भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे,भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर,गोपाल पाटील राऊत,भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस नितीन काळे यांनी सत्कार केला यावेळी विष्णुपंत खाडे,सुनील बेलोकर,नंदकिशोर मगर,शालीक ढोणे,गजानन पाटील,डॉ.रवींद्र मोरे,बबनरावजी मोरे,खुशालराव ढोणे,डॉ.प्रल्हाद कोकाटे,किशोर गोमाशे,भारतभाऊ नागरे,मच्छिन्द्र ढोणे,गुलाबराव पांढरे,सरपंच विनोदराव बाजड,गजानन कोकाटे,विष्णुपंत बोडखे,अमोल लोथे,अतुल थेर,बंडू पाटील,एसपी पल्लोड, गोपाल जाधव,शंकर दुबे,सुधीर सरकटे,समाधान घोळवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व समर्थक हजार होते.त्यानंतर सभापती व उपसभापती यांचा खासदार भावनाताई गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.चंद्रशेखर देशमुख,निवासी उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी यांनी सत्कार केला.यावेळी युवासेना तालुकाप्रमुख गजानन अवताडे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment