BREAKING NEWS

Sunday, April 23, 2017

कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे स्वाक्षरी अभियान


स्वाक्षरी अभियान राबवतांना हिंदुत्वनिष्ठ आणि नागरिक
आग्रा (उत्तरप्रदेश) – येथे पाककडून अटकेत असणारे भारतीय नागरिक श्री. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रहित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या वेळी समितीचे आणि हिंदू सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कुलभूषण जाधव यांनी फाशी देण्याऐवजी मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा प्रमुख हाफिज सईद याला पकडून फाशी देण्याचे धाडस पाकने दाखवावे. भारत सरकारना पाकवर दबाव निर्माण करून कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रहित करून त्यांना मुक्त करावे, अथवा पाकला जशास तसे उत्तर द्यावे. यासाठी आतापर्यंत भारतात अटकेत असणार्‍या पाकच्या गुप्तहेरांना फासावर लटकवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.