BREAKING NEWS

Monday, April 24, 2017

अचलपूर नगरीत भव्य स्टाँल प्रदर्शनी व समुह सखी मेळावा

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-

मानव स्वभावाचे अनुमान,प्रसंग पाहोनी.पुढील काळाचे अनुसंधान,स्त्रियांचे ठायी.या ऊक्तीप्रमाने. जागतीक महिला दिनानिमीत्य नाबार्ड पुरस्कृत आश्रय सेवाभावी सोसायटी मोर्शी अंतर्गत अचलपूर व चांदुर बाजार तालुक्यातील स्वयंसहाय बचत गटांचा दोन दिवसीय भव्य स्टाँल प्रदर्शनी व समुह सखी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
  राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड पुरस्कृत आश्रय सेवाभावी सोसायटी मोर्शी अंतर्गत आज २४ एप्रिल व उद्या २५ एप्रिल रोजी स्थानीक मोती मंगल कार्यालय अमरावती रोड परतवाडा येथे भव्य स्टाँल प्रदर्शनी व समुह सखी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नारायणजी पौणिकर डी.डी.एम.नाबार्ड अमरावती यांच्या हस्ते उदघाटन दिपकजी अलोने जिल्हा समन्वयक को.आँप.बँक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी पथनाट्य स्पर्धा व नाटीका,सांस्कृतिक कार्यक्रम,खेळांची स्पर्धा,परिसंवाद,कवी संमेलन व गीतगायन अश्या विविध कार्यक्रमासोबत महिला स्वयंसहाय बचत गटांच्या महिलांच्या गृहोद्योग व कलाकृतींचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त व्ही.के.राठोड उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे,सुनिलजी रामटेके,जितेन रामगुडे,अजय कुलकर्णी,डाँ.निरूपमा देशपांडे,प्रदिप जगताप , विजय वाघ,सुचीता बर्वे व रशीक शाह आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे म्हणून सर्व महिलांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आश्रय सेवाभावी सोसायटी व अस्तित्व महिला स्वयंसिध्द संघ अचलपूर व तालुकातील सर्व स्वयंसहाय समुह यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.