BREAKING NEWS

Monday, April 24, 2017

एक आगळी वेगळी भीम जयंती पिंपळाचे केले वाटप;किशोर कांबळे यांचा पुढाकार

दिग्रस (जय राठोड)-


मला डोक्यावर न घेता डोक्यात उतरवा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वचन प्रसिद्ध आहे.भीमजयंतीला कोणताही वायफळ खर्च न करता दिग्रस तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी नुकतेच पिंपळ वृक्षांचे वाटप केले.निमीत्त होते भीम जयंतीचे.
      14 एप्रिल ला पुर्ण भारतभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी झाली.कोणी डीजे च्या तालावर तर काहींनी अडमाप खर्च करून मिरवणुकीवर पैशांची उधळण करण्यात धन्यता मानली.मात्र दिग्रस येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा दिग्रस तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष असलेले किशोर कांबळे या तरुणाने महाराष्ट्र राज्य मातंग सेवा संघाचे सचिव विलास कजबे यांना पिंपळाचे वृक्ष देऊन झाड जगविण्यासाठी त्यांच्या कडुन शपथ घेतली.विलास कजबे यांनी सुद्धा संगोपन करण्याचा मानस व्यक्त केला.आज पर्यावरणाचा संतुलन बिघडत चालले असतांना पिंपळ वृक्ष अहोरात्र ऑक्सिजन देण्यास समर्थ आहे.या छोट्याश्या कृतीमुळे किशोर कांबळे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.