Monday, April 24, 2017
समाजभान:२६ वर्षापासुन करताहेत अखंडित सेवा शिव महाराज यांची वाटसरुसाठी पाणपोई
Posted by vidarbha on 5:06:00 PM in दिग्रस(जय राठोड )- | Comments : 0
दिग्रस(जय राठोड )-
या भौतिक जगात ख्याली खुशाली विचारण्यास कुणालाही वेळ नाही,दुसऱ्यांची तहान भागविणे तर दूरच!वेळोवेळीच्या दुष्काळामुळे पाणीटंचाईची झळ सर्वांनाच बसते.अशावेळेस घरातील एक पेला पाणी दुसऱ्यांना देण्याची वेळ आली तर आपण आकडता हात घेतो.मात्र तालुक्यातील आरंभी येथील एका ६० वर्षाच्या अवलियाने वाटसरूंची तहान भागावी, या उदात्त हेतुने गेली २६ वर्षांपासुन पाणपोई चालवली आहे.
आरंभी येथील शिवदयाल चव्हाण(महाराज) असे या ६० वर्षाच्या अवलियाचे नाव असुन गावापासुन किलोमीटर अंतरावर जंगलानजीक चौफुली आहे.आरंभी गावाचे मेन पॉईंट असलेल्या चौफुलीवर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते.उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची कोणत्याच सोय नसलेल्या या जागेवर वाटसरूंची तहान भागविण्यासाठी या संवेदनशील माणसाने आपले सर्वस्व झोकत पाणपोईची निर्मिती केली.त्या जागेत पाणी उपलब्ध नसतांना सुद्धा चौफुलीवरून एक किलोमीटर दुरून विहिरीतुन गुंडाने पाणी आणायचे आणि माठ भरायचा,असा त्यांचा नित्यक्रम! त्यासाठी त्यांना भर उन्हात वणवण भटकावे लागे.हि दैन्यावस्था बघुन पाण्याच्या सरसकट व्यवस्थेसाठी युवा गर्जना संघटनेने ग्रा. पं.कडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.त्याचा परिपाक म्हणुन ग्रा. पं. ने तेथे पाण्याचा हौद आणि नळ बसविले.त्यामुळे शिवदयाल महाराज यांचे श्रम वाचले आहे. आता या ठिकाणी माणसे,गुरे ढोरे व जंगलातील प्राणी सुद्धा पाणी पिण्यास येतात.
शिवमहाराज अत्यंत गरीब असुन सुद्धा मनाने श्रीमंत असल्याची भावना जनमाणसातून उमटताना दिसते.त्यांच्या या सेवाकार्यामुळे लोकांची तृष्णा भागते.त्यांचे सेवाकार्य उजेडात यावे,यासाठी युवा गर्जना संघटनेचे संस्थापक जयकुमार राठोड व सुधीर राठोड प्रयत्नशील आहे.
माझी सेवा हि निस्वार्थी असुन २६ वर्षापासून मी हे सेवाकार्य करतो आहे.उन्हाळ्यात लोकांची तृष्णा तृप्ती करणे,माझ्यासाठी सर्वोत्तम आहे.लोकांच्या हितासाठी या ठिकाणी ग्रा. पं व शासनाने एखादे सभामंडप उभारावे,अशी मागणी असल्याचे समाजसेवक शिवदयाल महाराज यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment