BREAKING NEWS

Monday, April 24, 2017

‘जय श्रीराम’ न म्हणणारे इतिहासजमा होतील ! – भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष

कोलकाता – 

गुजरातपासून गुवाहाटीपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात ‘भारतमाता की जय’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा द्यायला हव्यात. जे कोणी त्यास विरोध करतील, ते इतिहासजमा होतील, असे प्रतिपादन भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केले आहे. ते २४ परगणा जिल्ह्यातील एका सभेत बोलत होते.
यावर तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चटर्जी म्हणाले, ‘‘घोष धर्माचा गैरवापर करून लोकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, तरी लोक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेतच आहेत. घोष यांच्या व्यतिरिक्त भाजपचा अन्य कोणताही नेता अशा भाषेत बोलत नाही.’’

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.