BREAKING NEWS

Sunday, April 16, 2017

मोजणीसाठी भुमीअभिलेख कार्यालयाला तीन मशीन देणार - भुमीअभिलेख कार्यालयाने तालुकास्तरावर शिबीर आयोजित करावे - पालकमंत्री श्री प्रविण पोटे

अमरावती -



जिल्ह्यात सध्या भुमापनासाठी तीन मशीन उपलब्ध आहेत व मोजणीचे प्रकरणांची संख्या मोठी आहे. यामुळे जमीन मोजणी लवकर होण्यासाठी जिल्हा नियोजन समीतीमधुन तीन मशीन भुमीअधीक्षक कार्यालयाला देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. महाराजस्व अभियानाच्या धर्तीवर तालुकास्तरावर शिबीरांचे आयोजन 18 ते 20 मे दरम्यान करण्याबाबत ही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.



या बैठकीला जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी, लाचलुचपत प्रतीबंधकचे अधिक्षक महेश चिमटे,भुमीअभिलेख उपअधीक्षक मंगेश पाटील व संबंधीत अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील भुमी अभिलेख कार्यालयाशी प्रलंबित संबधित प्रकरणांची संख्या वाढत आहे. या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी उपलब्ध तीन मशीनवर कार्यभार वाढलेला होता असे चर्चेअंती लक्षात येताच बैठकीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जिल्ह्यात मार्च अखेर 6569 प्रकरण दाखल झाली होती पैकी 4876 प्रकरण निकाली निघाली असुन 1692 भुमी अभिलेख प्रकरणे प्रलंबीत असल्याने पालकमंत्र्यानी या प्रकरणांचा सखोल आढावा घेतला. प्रलंबित प्रकरणांची स्थिती काय व कोणत्या कारणाने प्रलंबित राहीले यांसंबंधी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जानेवारीपर्यत अमरावती शहरात भुमापनाची 183 प्रकरणे दाखल झालेली आहेत. महानगरपालीका क्षेत्रातील 12 नवीन गावांचा समावेश झाल्याने अतिरीकत कामासाठी नविन मशीनची आवश्यकता आहे. यामुळे भुमापनाचे काम जलदगतीने होईल.जिल्ह्यातील 80 हजार मिळकतीमधील 4 ते5 हजार मिळकतीच्या रेकॉर्डमध्ये दुरूस्ती असल्याची माहिती यावेळी उपअधिक्षक भुमी अभिलेख मगेंश पाटील यांनी दिली.
ग्रामीण भागातील लोकांना मिळकतीच्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करावा असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यावेळी समाजकल्याण विभागाचे प्रादेशीक उपायुक्त दिपक वडकुते,उपमुख्य कार्य अधिकारी माया वानखडे यांच्याशीही पालकमंत्र्यानी चर्चा केली.
विद्यापीठाचे गुणवाढ प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याबाबत काही विदयार्थ्याना हायकोर्टाचया आदेशानुसार परीक्षेपासुन वंचीत केले होते.यातील विदयार्थ्यानी आज पालकमंत्रयाना निवेदन दिले तेव्हा विदयापीठाचे परीक्षा नियंत्रक जयंत वडते यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्याचे शैक्षणीक वर्ष वाया जाणार नाही याबाबत पालकमंत्र्यानी सुचना केल्या.

Share this:

1 comment :

  1. Saheb 5 years zale pn result lagla nahi yevdhe jabardast Bhumi Abhilekh ch karyalay aahe aahet tyancha beshram cha zal deun satkar karayala pahije
    Hat tumchi kahi galti nahi pn tyanchya mule pudharyanchi have kharab hote pote saheb
    Saheb Jr tyanchya gr kanakhali aavag kalala tr samgel tyana

    ReplyDelete

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.