विविध संघटनांच्या वतीने अल्पोपहार व पेयजलचे वाटप
चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-
विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६वी जयंती चांदूर
रेल्वे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डिजेच्या गजरात निल उधळीत
शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यामूळे संपूर्ण शहर बाबासाहेबांच्या जयघोषानं
दूमदूमले होते.यावेळी विविध संघटनांनी अल्पोहार व पेयजलचे वाटप केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक मिलिंद नगरात आंबेडकरी जनतेनी
सजविलेल्या ट्रक्टरवर महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमा ठेवून
खडकपुरा, बालाजी चौक, सिनेमा चौक, मेन रोड, जुना मोटर स्टँड व गांधी चौकातून डिजेच्या
तालावर निळ उधळीत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत रॅली
काढली.सकाळी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांनी इंदिरानगरातील बुध्द विहार व मिलिंद
नगरातील बुध्द विहारात जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण
करून विनम्र अभिवादन केले. तर रॅली दरम्यान डॉ.क्रांतीसागर ढोले, छोटू विश्वकर्मा,
प्रा.प्रभाकर वाघ, प्रदीप वाघ, नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, मुख्याधिकारी
रवींद्र पाटील व नगरसेवक प्रवण भेंडे, गोटू गायकवाड, स्वाती मेटे, शारदा मेश्राम, स्वाती
माकोडे, शारदा मेश्राम, शुभांगी वानरे, अजय हजारे, दीपाली मिसाळ, यांच्यासह अनेकांनी
पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तर ठिकठिकाणी रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात
आले. सायंकाळी ७ वाजता स्थानिक इंदिरानगर येथील बुध्द विहार व भीम नगर येथून
सजवलेल्या रथावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा ठेवून डिजे व ढोल ताश्यांच्या
गजरात रॅली काढण्यात आली. भिमनगर येथून एका रॅलीला सुरूवात झाली.शिवाजी नगर,
रेल्वे स्टेशन, बस स्थानक मार्ग होत रॅली विरूळ चौकात आली.त्यावेळी इंदिरा नगर येथून
निघालेली रॅली व भिमनगरातून आलेल्या रॅलीचा मिलाप विरूळ चौकात झाला व तेथून ही भव्य
रॅली विरूळ चौक, तहसील कार्यालय मार्ग, जुना मोटर स्टँड चौक, गांधी चौक, सिनेमा चौक,
संत गाडगेबाबा मार्केट , रामनगर होत इंदिरा नगर बुध्दविहार येथे रॅलीचा समारोप झाला.
रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करून मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना
पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या रॅलीत शहरातील आंबेडकरी जनता
मोठया संख्येने सामील झाली होती.
अल्पोपहार व शीतल पेयजल वाटप
अल्पोपहार व शीतल पेयजलचे वाटप करण्यात आले. जुना मोटर स्टँड चौकात घोडेस्वार
गुरूजी, राष्ट्रपाल मेश्राम, धिरज वाघमारे,विनोद डोंगरे,खुशाल खडसे, धर्मराज वरघट, विलास
तांडेकर, राहूल कावरे यांनी बुंदी वाटप व शितल पेयजलचे वाटप केले.तर विरूळ चौकात
भास्कर लाडे, गजानन सहारे, राजेंद्र वानखडे, पुरूषोत्तम बनसोड, प्रदीप गेडाम, उत्तम मोहोड
यांच्यातर्फे बुंदी व शितल जलचे वाटप केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल जवळ
समता विचार संघटना,चांदूर रेल्वेचे भास्कर बनसोड, सुशिल मेश्राम, प्रकाश रंगारी, उमेश
गोंडाणे, बबन देवपारे, मुरलीधर भगत, प्रदीप घोडेस्वार, गौतम वाकडे,आदेश बनसोड, संजय
बेंदले, प्रफुल सवाई, विजय सोनोने, हर्षना बेंदले, गजानन कांबळे, विजय बनसोड, पद्माकर
बनसोड, प्रफुल स्थुल, सुमेध मेहरे, दीपक भगत, किशोर बनसोड, जितेंद्र मकेश्वर, निरंजन
गोल्हे, अनंत गजबे यांच्या तर्फे रॅलीतील आंबेडकरी बांधवांना बुंदी, पोहे व शितल जलचे
वाटप केले.
Post a Comment