महेन्द्र महाजन जैन / रिसोड
मालेगांव :- व्यक्ति कोणत्या जाती धर्मात जन्माला आला याला महत्व नसुन त्यावर सुसंस्कार झाले का ? हे महत्वाचे आहे पैसा कितीही कमावला परंतु संस्काराची शिदोरी नसेल तर तो काहीही कामाचा नाही जीवनात यशस्वीतेसाठी संस्कार हे महत्वाची भुमिका बजावत असतात युवक व युवतीनीे महत्व लक्ष्यात घ्यावे. या कडे कविताताई वेणुरकर यांनी लक्ष वेधले मुलींचे श्रीगुरूदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीर शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या.
जीवनात यशस्वीतेसाठी संस्काराचे महत्व नाकारता येत नाही असे कविताताई सांगितले सध्या संस्काराचा मोठा अभाव असल्यामुळे विवीध समस्याचा सामना करावा लागत आहे असे ही ताई म्हणाल्या.स्थानिक श्री गुरूदेव सेवाश्रम मुलींनसाठी सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे मुख्य शिक्षिका म्हणून कविताताई वेणुरकर व सह शिक्षीका आश्वीनी केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिबीरामध्ये 75 मुलींचा सहभाग आहे शिबीर दहा दिवस चालणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी किन्हीराजा सरपंचा सौ.वेणुबाई जामकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून किन्हीराजा पोलीस पाटील महादेव तायडे राजेश घुगे सदाशिवराव घुगे विष्णुपंत हरणे हे होते इंदुबाई आफ्रुटकर संपदा इंगळे आशाताई खुरसडे गजानन इंगळे पांडुरंग खुरसडे महादेव हरणे सिताराम जामकर तेजस सोळंके वैजनाथ हवा अोम इंगळे सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Post a Comment