महेन्द्र महाजन जैन / रिसोड
वाशिम, : जिल्ह्यामध्ये सन २०१७-१८ या वर्षात उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदानावर अवजारे, यंत्रे देण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि. १५ मे २०१७ पर्यंत सादर करावेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्पभूधारक शेतकरी व महिला लाभार्थी यांना ट्रॅक्टरकरिता १,२५,००० रुपये, कल्टीव्हेटरसाठी ४४,००० रुपये, रोटाव्हेटरसाठी ६३,००० रुपये, सीड ड्रीलसाठी ४४,००० रुपये, सीड काम फर्टिलायझर ड्रीलसाठी ४४,००० रुपये, वीडर (पी. टी. ओ. ऑपरेटेड) साठी ६३,००० रुपये, थ्रेशरसाठी ६३,००० रुपये, ट्रॅक्टर माउंटेड-ऑपरेटेड स्प्रेयरसाठी ६३,००० हजार रुपये, मिनी दालमिलसाठी १,५०,००० रुपये, पॅकिंग मशीनसाठी १,५०,००० रुपये, ग्राईंडरसाठी ४४,००० रुपये, पल्वराइजरसाठी ४४,००० रुपये, पॉलिशरसाठी ४४,००० रुपये पर्यंत अनुदान देण्यात येईल.
इतर प्रवर्गातील लाभार्थींना ट्रॅक्टरकरिता १,००,००० रुपये, कल्टीव्हेटरसाठी ३५,००० रुपये, रोटाव्हेटरसाठी ५०,००० रुपये, सीड ड्रीलसाठी ३५,००० रुपये, सीड काम फर्टिलायझर ड्रीलसाठी ३५,००० रुपये, वीडर (पी. टी. ओ. ऑपरेटेड) साठी ५०,००० रुपये, थ्रेशरसाठी ५०,००० रुपये, ट्रॅक्टर माउंटेड, ऑपरेटेड स्प्रेयरसाठी ५०,००० हजार रुपये, मिनी दालमिलसाठी १,२५,००० रुपये, पॅकिंग मशीनसाठी १,२५,००० रुपये, ग्राईंडरसाठी ३५,००० रुपये, पल्वराइजरसाठी ३५,००० रुपये, पॉलिशरसाठी ३५,००० रुपये पर्यंत अनुदान देण्यात येईल.
प्रत्येक अवजार, यंत्रासाठी शेतकऱ्यांनी स्वतंत्र्य अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि ज्या अवजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे, त्या एकास यंत्र, अवजारास अनुदान दिले जाईल. लाभार्थी निवड तालुका हा घटक मानून जिल्हास्तरावर करण्यात येईल. अर्जाचा विहित नमुना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अथवाwww.krishi.maharashtra.gov.inया कृषी विभागाचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेसाठी अर्ज सादर करावेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे
Post a Comment