अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त अचलपूर सत्र न्यायालयाचे प्रांगणात आज डाँ.बाबासाहेब यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले आहे.
भारतरत्न घटनेचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमीत्त अचलपूर सत्र न्यायालयात उद्या दिनांक १६ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलूवर प्रकाश टाकून त्यांच्या जीवनातील घडामोडींचे आकलन आपल्या प्रमुख व्याख्यानातून *उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरचे मा.न्यायमुर्ती प्रसन्ना वराळे* करणार आहेत.याप्रसंगी अध्यक्ष म्हणून अँड.अनिल किलोर अध्यक्ष उच्च न्यायालय बार असोसिएशन,उदघाटक अँड.मोतीसींग मोहता माजी अध्यक्ष बार काऊसींल आँफ महाराष्ट्र व गोवा तसेच प्रमुख अतिथी म्हणुन मनोज शर्मा प्रबंधक उच्च न्यायालय व एस.जी.गीरडकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती उपस्थित राहतील ह्या व्याख्यानाचा समस्त नगरवासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन अँड.तरूण शेंडे अध्यक्ष अचलपूर वकीलसंघ,उपाध्यक्ष अँड.भोलाजी चव्हाण,सचिव धर्मेंद्र यावले,सहसचिव अनिकेत शुक्ला,रिना जयस्वाल,प्रशांत गाठे,विकास साखरे,भालचंद्र लाड व समस्त वकील संघ सदस्य यांनी केले आहे.
Post a Comment