अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
सामाजिक बांधिलकी जपणारा कृतीशील समाजसेवकांचा एकता रँली आयोजन समिती तर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक बांधिलकी जपणारा कृतीशील कार्यकर्ता अपेक्षित होता.जयंत सोनोने यांनी अशाच कृतीशील कार्यातून सामाजिक ऋण फेडले आहे म्हणून त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी एकता रँली आयोजन समिती अमरावती व डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने त्यांना समाज गौरव पुरस्कार देण्यात आला.याप्रसंगी दलीतमीत्र राजूजी नन्नावरे मुख्य संयोजक व राजेशभाऊ अटलानी समितीचे अध्यक्ष यांनी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चांदेकर यांचे प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे आयोजित १४ एप्रिल च्या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन जयंत सोनोने यांचा गौरव करण्यात आला.जयंत सोनोने अचलपूर चा रहिवासी असून तो विविध सामाजिक संघटना सोबत जुळलेला युवक आहे.स्थानीक जगदंब महाविद्यालय येथे आपले उच्च शिक्षण प्राप्त करून सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करिता आहे.विद्यार्थी संघटना,पत्रकार संघटना सोबत राहून अनेक सामाजिक उपक्रमात कृतीशील कार्य करण्याची त्याची जिद्द आहे आम्ही सारे या संघटनेसोबतही जयंत जुळलेला आहे.सामाजिक कार्य म्हटले की ना नफा ना तोटा या उद्देशाने कार्य करने सध्या तरी कुणाला न आवडणारा विचार आहे त्यातल्या त्यात युवाशक्ती या बाबतीत क्वचितच विचार करतांना दिसते.जयंत हा सामान्य कुटुंबातील युवक समाजसेवे प्रती जागृत असून येणा-या पिढीला नक्कीच आदर्श ठरू शकतो अशा शब्दांत प्रमोद नैेकलेसर,विलास बेलसर, जीतेन्द्र रोडे ,प्रमोद गरोडे सर,दिनेश कलास्कर सर, नरेन्द्र जावारे ,राज इंगले ,आशीष गवई ,समीर गवळी, चेतन सोनोने, वैभव घोलप, अभिजीत पडोले,व आशिष राठोड यांनी त्याचे अभिनंदन करतांना आपले मत व्यक्त केले आपल्या या गौरवा जयंत याने आपल्या वडील,बहिणी व सर्व मार्गदर्शक शिक्षक मित्रमंडळी यांना श्रेय देतो.या त्याच्या गौरवाबद्दल त्याचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
Post a Comment