BREAKING NEWS

Monday, April 24, 2017

भारताची प्रथम क्रमांकाची प्रकाश देणारी कंपनी म्हणजे सुर्या सुर्या कंपनीचे जुळ्या शहरात चाहते मोठ्या प्रमाणात

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-


विजेचा उपयोग आज अनिवार्य झालेला आहे त्यामुळे विज बचत करून आपल्या गरजा भागवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असतो.याच विश्वासाने आपल्या ग्राहकांना गेल्या ४४ वर्षांपासून सतत सेवा देणारी देशातील प्रथम क्रमांकाची कंपनी म्हणजे सुर्या कंपनी होय.


देशातच नव्हे तर अनेक देशात नावलौकिक मीळवणा-या
या कंपनीने अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा जुळ्या शहरात सुध्दा मोठया प्रमाणात चाहते प्राप्त केले आहेत याचे प्रत्यंतर नुकत्याच स्थानीक सुर्यकमल ईन हाँटेल मध्ये संपन्न झालेल्या वितरकांच्या मेळाव्यावरून स्पष्ट झाले.येथे कंपनीने आपल्या विविध उत्पादनाची माहिती रायपूर हेड गोंवीदजी,संतोषजी व अकोला हेड रमेशकुमार सिंह यांनी आपल्या शेकडो वितरकांना दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन अमरावती मुख्य वितरक बाबुभाई चांडक यांनी केले आपली ३१ वर्षे कंपनीच्या सेवेत यशस्वीपणे त्यांनी दिल्याबद्दल कंपनीने त्यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव केला व त्यांच्या सोबत पुढे त्याचा मुलगा ही कामगिरी तेवढ्याच जोमाने पार पाडीत असल्याबद्दल त्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.बाबुभाई यांनी आपल्या मनोगतात सांगतांना म्हटले की सुर्या कंपनीचे वीतरक म्हणुन कार्य मी अचलपूर परतवाडा  शहरातून सुरू केले या शहराने मला खूप काही दिले माझ्या यशस्वी कार्यामध्ये या जुळ्या शहरातील सर्व माझ्या सहकारी वितरक व विक्रेते बंधुंचे मोठे श्रेय आहे.
याप्रसंगी बाबूभाई यांनी अचलपूर,पथ्रोट,चांदूरबाजार,करजगाव व वाठोडा येथून आलेल्या सहवितरकांना चांदीचे शीक्के देवून सन्मान केला तसेच लकी कुपन देवून भेट वस्तू दिल्या लकी कुपनाच्या सोडतीत प्रथम जयदुर्गा इले.द्वीतीय सदगुरू,आर्शीवाद इले.तर तृतीय महालक्ष्मी,स्टार,वैष्णवी,पटवारी,ऋतीक व शिव इलेक्ट्रीकलस यांना प्राप्त झाले तसेच बंपर प्राईज ओम जनरल स्टोअर प्राप्त झाले, सर्वात जास्त बुंकीग मध्ये ओम जनरल स्टोअर,कृष्णा मार्केटिंग,सुमीत इले व शिवशक्ती इलेक्ट्रॉनीक्स यांना देण्यात आले. कंपनीचे उत्कर्षाबद्दल माहिती देतांना सांगितले की वर्षाला साडेचार हजार करोड रुपयांची उलाढाल होते तसेच एल.ई.डी,सीएफएल,जी.एल. एस .एल.ईडी,ट्युब लाईट,प्रेस,पंखे सोबतच पीव्हीसी व स्टील पाईप सुध्दा उत्पादीत करते कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आठ हजार मेट्रीक टन एक इंचापासून शंभर इंचापर्यंत पाईपची निर्मिती करते १९७३ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीला शासनाचे एस.टी.आई.टी.प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.याप्रसंगी बाबूभाई चांडक लक्ष्मी ट्रेडर्स अमरावती यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार मांडले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.