नंदूरबार / नवापूर:
आज गुजरात सीमेत प्रवेश केल्या नंतर गुजरात पोलिसांनी आमदार बच्चू भाऊ कडू यांना अटक केली.
हजारावर पोलिसांचा ताफा सकाळ पासूनच धुळे-नवापूर-सुरत
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर गुजरात पोलीस तैनात होते
गुजरात मधील बार्डोली येथे शेतकरी आसूड यात्रेचे स्वागत व बच्चू भाऊंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
सकाळी ९ वाजता साक्री जिल्हा नंदुरबार येथे सभा आटपून बच्चू भाऊ आपल्या आसूड यात्रेतील वाहनांच्या ताफ्यासह बार्डोली साठी निघाले होते त्या पूर्वी काही कार्यकर्ते यांची वाहने सभेच्या दिशेने जातांना त्यांना अडवून पोलिसांनी
अरे रावी करत परत पाठविले.
या नंतर बच्चू भाऊ तेथे पोहचले
पोलिसांनी परवानगी नाही हे कारण दाखवून आसूड यात्रा रोखली.
रक्तदान करण्यासाठी परवानगी कशाला पाहिजे असा सवाल बच्चू भाऊंनी केला पण पोलिसांना गुजरात सरकारचा बच्चू भाऊ कडू यांना अटक करण्याचाआदेश होता.
या ठिकाणी सुमारे तास भर बच्चू भाऊ व शेकडो कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते.
तिकडून गुजरात मधील काही शेतकरी नेते आले त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आसूड यात्रेतील आंदोलक शेतकऱ्यांसाठी जेवण आणण्यास सांगितले होते.
जेवण घेऊन येणाऱ्या गुजरातच्या शेतकऱ्यांना सुद्धा पोलिसांनी पांगवले.
"गुजरात में खाना तो क्या,पाणी भी नही मिलेंगा"अशी चीड आणणारी भाषा पोलीस अधिकारी वापरत होते.
सुरवातीपासूनच तयारीत असलेल्या आमदार बच्चू भाऊंना
अखेर पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले व अटक करून
पोलीस स्टेशनला नेले इकडे
आसूड यात्रेतील शेकडो वाहन चालक व कार्यकर्त्यांना लाठी व शास्त्राचा धाक दाखवत माघारी
महाराष्ट्राच्या सीमेत परत पाठवले.
रक्तदान करायला निघालो,तुम्ही रक्ताचा शेवटचा थेंब जरी सांडवला तरी बच्चू कडू माघे हटणार नाही हि भूमिका बच्चू भाऊंनी घेतल्याने पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.
आता आम्ही महाराष्ट्राच्या हद्दीत गुजरात सीमेवर आहो.
बच्चू भाऊंचे व माझे बोलणे झाले असून त्यांनी कार्यकर्त्यांना तूर्तास पुढील भूमिका स्पस्ट होई पर्यंत
थांबण्यास सांगितले असून आम्ही आता नवापूर तहसील कार्यालयात
निवेदन देऊन बच्चू भाऊंच्या अटकेचा निषेध नोंदवत येथेच ठिय्या मारून बसणार आहो.
महाराष्ट्रातील १६ जिल्ह्या मधून शेतकरी आसूड यात्रा २२०० किलोमीटर चा १० दिवस प्रवास करून आली होती
या दरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी ठीक ठिकाणी सहकार्यच केले पण
गुजरात पोलिसांनी तालिबानी,अविवेकी,दहशती,अतिरेकी धोरण घेऊन आसूड यात्रा रोखली व आमदार बच्चू भाऊंना अटक केली
आम्ही या घटनेचा प्रहार जनशक्ती पक्ष व संघटनेकडून जाहीर निषेध करतो,गुजरात पोलीस व सरकारचा जाहीर धिक्कार करत आहे
Post a Comment