चांदुर रेल्वे - (शहेजाद खान .) -
गेल्या अनेक तपापासुन कॉंग्रेसमधील सच्चे कार्यकर्ते म्हणुन ओळख असलेले, स्थानिक आमदार विरेंद्र जगताप यांचे निकटवर्तीय, तालुक्यातील घुईखेड येथील राहिवासी वसंतराव चनेकार यांचे बुधवारी पहाटे ५.३० वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.
वसंतराव चनेकार हे घुईखेड गावातील अष्टपैलु व्यक्तीमत्व होते. ते अनेक वर्षांपासुन कॉंग्रेस पक्षाचे काम करीत होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे गावातील विरोधकांनाही आवडेल असे व्यक्तीमत्व हरविले आहे. असा दुसरा सच्चा कार्यकर्ता होनेच नाही अशी प्रतिक्रीया अनेकांनी दिली. वसंतराव चनेकार मृत्युसमयी ५५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे १ मुलगा, २ मुली, पत्नीसह बराच मोठा आप्तपरीवार आहे. बुधवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर घुईखेड येथील हिंदु स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आहे. यावेळी आमदार विरेंद्र जगताप यांच्यासह शेकडो गावकरी उपस्थित होते. त्यांच्या मृत्युमुळे संपुर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे..
Thursday, May 11, 2017
कॉंग्रेस कार्यकर्ते वसंतराव चनेकार यांचे दु:खद निधन आमदारांचे होते निकटवर्तीय
Posted by vidarbha on 6:32:00 AM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान .) - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment