BREAKING NEWS

Sunday, May 28, 2017

तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार कृतीत उतरवा: -श्री गणेश पाटील


महेंद्र महाजन जैन (रिसोड ) वाशिम


मालेगांव :-
आगामी  15 ऑगस्ट पर्यंत मालेगाव तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार
कृतीत उतरविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी
उपस्थित सरपंच, ग्रामसेवक आणि व्हिलेज च्ॉम्पिअन यांना केले. ते तालुका
हागणदारीमुक्त करण्यासाठी मालेगाव येथील बालाजी मंगल कार्यालयात आयोजित
निर्धार सभेत गुरुवारी बोलत होते. यावेळी जि. प. च्या समाज कल्याण सभापती
पानुबाई जाधव, महिला व बाल कल्याण सभापती यमुनाबाई जाधव, मालेगाव पंचायत
समिती सभापती मंगलाताई गवई, पं. स. उपसभापती ज्ञानबा सावळे, जिल्हा परिषद
सदस्य विकास गवळी, मुंबई येथील वासो कार्यालयाचे समन्वयक अरुण रसाळ,
प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक साने, कोल्हापुरचे विजय
पाटील, गोपीचंद गवई, उध्दव राऊत, दिपक राऊत,गजानन शिंदे, गटविकास अधिकारी
थोरात आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना सीईओ गणेश पाटील म्हणाले गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी
सरपंच, व्हिलेज च्ॉम्पिअन आणि ग्रामसेवक यांनी सुक्ष्म नियोजन करणे
आवश्यक आहे. गावातील जे सधन कुटंुबे आहेत त्यांना शौचालय बांधण्याबाबत
तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि ज्या कुटंुबांची आर्थिक परिस्थिती नाही
अशांना शौचालयाचे साहित्य जसे विटा, रेती, सिमेंट, प्रशिक्षित गवंडी
उपलब्ध करुन देणे हे काम ग्रामसेवक व ग्रामपंचायतच्या पदाधिकाज्यांनी
करणे अपेक्षित आहे. आपल्या गावात किती शौचालय बांधायचे यानुसार प्रत्येक
ग्रामसेवकांनी आपले नियोेजन करणे अपेक्षित असल्याचे सांगुन पाटील म्हणाले
कि सरपंच- ग्रामसेवक मंडळींनी शौचालय बांधणाज्या पात्र लाभार्थांना
बक्षीस  मिळण्याची हमी दिली तरी या कामाला गती येईल.
मालेगाव तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी तालुक्यात मागील आठ दिवसांपासुन
कोल्हापुरची टीम प्रयत्नशिल आहे. गावकर्यांनी या संधीचा फायदा करुन
घेण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी निर्धार सभेचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानबा सावळे, जि. प.
सदस्य विकास गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. वासो चे समन्वयक अरुण रसाळ
यांनी हागणदारीमुक्त वातावरणात ध्वजारोहण करण्यासाठी येत्या 15 ऑगस्ट
पुर्वी तालुका हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. यावेळी शौचालय
प्रोत्साहन अनुदानाच्या प्रस्तावाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते
करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी थोरात यांनी
केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी
गणेश पाटील यांनी प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक साने यांचे
कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजु
सरतापे यांनी तर आभार प्रदर्शन राम श्रंृगारे यांनी केले. प्रफुल्ल काळे,
शंकर आंबेकर, सुमेर चाणेकर, पुष्पलता अफुणे, विजय नागे, विस्तार अधिकारी
येनकर, अभिजित दुधाटे, रविचंद्र पडघान, गटसमन्वयक सदानंद राऊत, सुखदेव
पडघान, दत्ता चव्हाण आदिंनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
ग्रामसेवक संघटनेचा पुढाकार:
तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने पुढाकार  घेतला असुन
याबाबतचे निवेदन या निर्धार सभेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष ए. जे. नवघरे आणि
सचिव अरुण इंगळे यांनी केले. प्रत्येक ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी
यांनी आपले गाव 15 ऑगस्ट पर्यंत हागणदारीमुक्त करुन सहकार्य करण्याचे
आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.