महेंद्र महाजन जैन / रिसोड -
सुरकंडी येथे एकदिवशीय शेती व शेतकरी कार्यशाळा
वाशीम - शेतकर्यांना समृध्द बनायचे असेल तर ओलीताची शेती करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत जमिनीतील पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. म्हणून पाणी पातळी वाढवायची असेल तर पावसाळ्यात पडणार्या पाण्याचा योग्य निचरा करावा लागेल. तेव्हाच शेती व शेतकरी समृध्द होईल असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी मिलींद अरगडे यांनी केले. ते तालुक्यातील सुरकंडी येथे 10 मे रोजी पार पडलेल्या एकदिवशीय शेती व शेतकरी कार्यशाळेत प्रमूख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
सुरकंडी येथील जनार्दन भोयर यांच्या शेतात पार पडलेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आदर्श शेतकरी फकीरा ठाकरे हे होते. यावेळी कृषी सहाय्यक नागरगोजे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, मारिया निलया कॉन्व्हेंटच्या व्यवस्थापक सिस्टर रोशन यांची प्रमुख उपस्थिती होती. गाव समृध्द करण्यासाठी आधी शेतकरी समृध्द करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेती करतांना येणार्या अडचणींचा सामना करता यावा याकरीता वार्म मिशन अंतर्गत ग्रामविकास समिती व जागृती सेवा केंद्राच्या वतीने ही कार्यशाळा घेण्यात आली. शेतकर्याना जैविक शेती करता यावी यासाठी करावयाच्या उपाययोजना व बारमाही पिके घेण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याबाबतची चर्चा यावेळी परिसंवादातून करण्यात आली. कार्यशाळेच्या सुरुवातीला शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. शेतकर्यांनी उत्स्ङ्गुर्तपणे आपल्याच समस्या उजागर केल्या. यावेळी कृषी सहाय्यक नागरगोजे यांनी शेतकर्यांनी मांडलेल्या समस्यांवर उपाययोजना संागीतल्या. शेतकर्यांना मिळणार्या शासनाच्या योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळवावा याबाबत माहिती दिली. तसेच शेतीत पिके घेतांना कृषी विभागाचा सल्ला घेण्याचे आवाहन केले. यावेळी सविस्तर मार्गदर्शन करतांना अरगडे म्हणाले की, सद्यस्थितीत जमिनीतील पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे शेतकर्यांना ओलीताची शेती करणे जिकीरीचे झाले आहे. शेतकर्यांना ओलीताची शेती करायची असेल तर प्रथम पाणीपातळी वाढविणे गरजेचे झाले आहे. यासाठी विहीर पुनर्भरण, नाला बांध, शेततळे, नाला रुंदीकरण, हायड्रोक्लिनींग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पध्दतीचा अवलंब करुन पावसाचे पाणी जमिनीत मुरवावे लागेल. किमान आठ महिने पुरेल एवढे पाणी जमिनीतून निघाल्यास ङ्गळबागांची शेती शेतकर्यांना करता येईल. यावेळी त्यांनी घाटा येथील शेडनेट शेती करणार्या शेतकर्यांची यशोगाथा सांगीतली. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनंाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अ.भा. सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार जागृती सेवा केंद्राचे शिवाजी गव्हाणे यांनी मानले. या कार्यशाळेला गावातील शेतकरी बहूसंख्येने उपस्थित होते.
Post a Comment