Saturday, May 13, 2017
संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त्त विविध कार्यक्रम
Posted by vidarbha on 8:09:00 AM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड -
वाशिम -
रिसोड-तालुक्यातील रिठद येथे धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीचे औचित्या साधत शंभुराजे मित्र मंडळाच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ त्यानुसार येथील संतकृपा सभागृहात शनिवार दि़ १३ रोजी सकाळी १० वाजता स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन तर रविवार दि़ १४ रोजी सायंकाळी ७ वाजता पुणे येथील व्याख्याते शिवश्री बालाजी गाढे पाटील यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे़
धर्मवीर संभाजी महाराजांच्या ३६० व्या जयंती निमित्त येथील शंभुराजे मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ येथील हनुमान मंदीराजवळ असलेल्या संतकृपा सभागृहात आयोजीत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून वाशीम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर व प्रा़प्रशांत गोळे मार्गदर्शन करणार आहेत़ तर रविवार दि़१४ रोजी ‘छत्रपती संभाजी महाराज व आजचा तरुण’ या विषयावर पुणे येथील बालाजी गाढे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे़वाशीम येथील हिंदु गर्जना ढोल पथकाचे सादरीकरण या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे़ या कार्यक्र्रमांचा लाभ जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमी नागरीकांनी घेण्याचे आवाहन शंभुराजे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे़सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल बोरकर, विशाल ठोकळ, गोपाल बोरकर, ओम बोरकर, शालिक बोरकर, भुषण बोरकर, वैभव फुलउंबरकर,संदीप बोरकर, वैभव ठोकळ, उमेश बोरकर, प्रविण बोरकर, पवन गिरी, शिवम बोरकर, योगेश बोरकर, अमोल बोरकर, गणेश गोडघासे, वैभव वाघ, शंभुराजे मित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी परीश्रम घेत आहेत़
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment