केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री डॉ.महेश शर्मा यांच्या हस्ते काल राष्ट्रीय संग्रहालयात स्वच्छ भारत ॲपचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानात लोकांना सक्रिय सहभागी करुन घेणे हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे.
|
सध्या हे ॲप अँड्रॉईड मोबाईल धारकांसाठी उपलब्ध असून, गुगल प्ले स्टोअरवरुन ते डाऊनलोड करुन घेता येईल. ज्या क्षणी तुम्ही संग्रहालयात प्रवेश कराल, त्यावेळी या ॲपद्वारे तुम्हाला स्वच्छ भारत अभियानाबाबतचा संदेश मिळेल आणि तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या कचऱ्याची माहिती द्या, असे सांगितले जाईल. तुम्ही तुमच्या मोबाईल मधला ब्लु टूथ कार्यान्वित करायचा आहे. तुमच्या मोबाईलमधे तुम्ही हे ॲप घेतले नसले, तरीही तुम्हाला गुगुलद्वारे स्वच्छ भारत अभियानाबाबत संदेश पाठवला जाईल आणि हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंकही पाठवली जाईल. तुम्ही हे ॲप डाऊनलोड केलत की, कचऱ्याचे छायाचित्र घेण्याविषयी हे ॲप विचारणा करेल आणि या छायाचित्रासोबत टिप्पणी लिहून पाठवायला सांगेल. त्यानंतर ते संबंधितांकडे पाठवले जाईल.
|
सांस्कृतिक मंत्रालय या ॲपवर देखरेख ठेवणार असून, नागरीकांमध्ये स्वच्छतेचे महत्व विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावेल.
|
Thursday, May 25, 2017
राष्ट्रीय संग्रहालयात ‘स्वच्छ भारत’ ॲपचा शुभारंभ
Posted by vidarbha on 5:24:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment