BREAKING NEWS

Thursday, May 18, 2017

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले ‘लोकराज्य’ अंकाचे कौतुक

नवी दिल्ली -

केंद्र शासनाला तीन वर्षपूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ अंकाचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी आज शास्त्री भवन येथे श्री.रामदास आठवले यांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने प्रकाशित मे महिन्याचा ‘लोकराज्य’ अंक भेट दिला. यावेळी श्री. आठवले यांनी या अंकातील विविध लेख, मुलाखती आणि महत्वपूर्ण माहिती आदी वाचले. या अंकातील लेख व मुलाखतींचा आशय, अकांची मांडणी उत्तम असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.
या विशेषांकाच्या माध्यमातून केंद्र शासनाची विविध क्षेत्रातील उपलब्धी , महाराष्ट्राला विविध क्षेत्रासाठी दिल्लीतून मिळालेला निधी आणि राज्यासंबंधी घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय आदी उत्तम प्रकारे या अकांतून वाचकांपर्यंत पोहचविण्यात येत असल्याचेही श्री. आठवले यांनी सांगितले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.