चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना एक दिवस मजुरांसोबत या संकल्पेंतर्गत ग्राम रोजगार दिनाचे आयोजन चांदुर रेल्वे पंचायत समितींतर्गत येणाऱ्या तालुक्यातील धानोरा मोगल येथे ३० एप्रील रोजी करण्यात आले होते.
या रोजगार दिनाच्या दिवशी नरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या हक्काविषयक व अनुषंगिक अनुज्ञेय लाभ देण्याची कार्यवाही करण्यात आली. या योजनेंतर्गत नोंदणीकृत मजुरांकरीता व इतर वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनाच्या पात्र लाभार्थ्यांकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धानोरा मोगलच्या संरपचा योगिता झार्केडे, सदस्य अमोल लायब्रर, सचिव राठोड, पटवारी पुसदकर, पंचायत समिती मग्रारोहयोचे स.का.अ. नेहा शर्मा, स्वराज्य मिञ मंडळ संस्थेचे अध्यक्ष राहुल बैस, बैस मॅडम तसेच धानोरा मोगल येथील रोजगार हमी योजनेचे महिला तथा पुरुष मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. असाच कार्यक्रम धानोरा म्हाली ग्रामपंचायत मध्येही राबविण्यात आला.
Tuesday, May 2, 2017
एक दिवस मजुरांसोबत या संकल्पनेंतर्गत ग्राम रोजगार दिनाचे आयोजन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना
Posted by vidarbha on 2:38:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment