चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
स्थानिक अखिल भारतीय सर्वशाखीय ब्राम्हण सभेच्यावतीने शनिवारी भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधुन राम मंदिरापासुन भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे चौकात शहीद जवानांना दोन मिनीटे मौन बागळुन श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच शहरातुन काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ब्राम्हण समाजाच्या सर्व युवक, युवती, स्त्री-पुरूष आपल्या पारंपारिक वेशभुषेमध्ये शामील झाले होते. यावेळी डि.जे. , बैंडच्या तालावर समाजातील युवक- युवती थिरकल्या. संपुर्ण शहर भगवामय झाले होते. भगवान परशुरामजी यांची महाआरती ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष विनोद तिवारी यांच्या हस्ते राम मंदिरात करण्यात आली. समाजाला संघटित ठेवण्याच्या उद्देशाने जेष्ठ मान्यवरांनी आपले विचारही यावेळी व्यक्त केले. नगर परीषद निवडणुकीत विजयी झालेले नगरसेवक महेश कलावटे, निलीमा शर्मा तथा ब्राम्हण सभेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हातगावकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन विजय मुडे यांनी तर आभार प्रदर्शन देवेश वाजपेयी यांनी केले. यानंतर आयोजीत स्नेहभोजनाचा लाभ सर्व समाज बांधवांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता लांबे गुरूजी, समाजाचे अध्यक्ष विनोद तिवारीसह सर्व समाज बांधवांनी अथक परीश्रम घेतले.
Tuesday, May 2, 2017
शहरात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी
Posted by vidarbha on 2:40:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment