अचलपूर श्री प्रमोद नैकेले /-
चारित्र निर्माण व संस्कार आज आवश्यक बाब झाली आहे.धकाधकीच्या जीवनात मातापितांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही तर वाढत्या स्पर्धात्मक युगात विविध कलागुण,चारित्र निर्माण व संस्कार याचे धडे बालकांना मिळत नाहीत म्हणून अश्या शिबिराची नितांत गरज आहे.याच उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून परतवाडा येथील तरूण मंडळी महर्षी दयानंद सरस्वती वैदिक विचार चँरिटेबल ट्रस्ट व्दारा अशा शिबिराच आयोजन करीत असते.
केशवनारायण मंदिर संस्थान सरायपूरा,अचलपूर येथे 20 मे ते 26 मे पर्यंत सात दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जवळपास 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पैकी 50 मुले तर 20 मुली पुर्ण वेळ निवासी शिबिरात सहभागी झाले होते.या सात दिवसात विद्यार्थ्यांना योगासन,कराटे,संस्कार,बौध्दिक व विविध कलागुणांचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात आले.या शिबिरात अचलपूर,परतवाडा शहरासह सालेपुर (पांढरी ), लाखनवाड़ी, कापुसतलनी, मल्हारा या ग्रामीण भागातील मुलामुलीनी भाग घेतला.
शिबिराला आचार्य शैलकुमार आर्य (बिलासपूर), शेखर आर्य (रायपूर), मणिशंकर आर्य (जांगीरचापा),सत्यप्रिय आर्य, कर्मवीरजी यांनी पूर्णवेळ मार्गदर्शन केले.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुशीलाताई इंगळे नगरसेवीका तसेच प्रमुख अतिथि प्रमोद नैकेले सर,बल्लू जी जवंजाळ, शीलताई बोचरे, योजना रमेशपन्त डवरे, माधुरिताई शिंगणे, प्रा. संजय राऊत,प्रा.मडावी, विलासजी बेलसरे, शरदराव कोसरे, सचिन कोसरे व देविदासजी इंगळे उपस्थीत होते याप्रसंगी मान्यवरांचे तसेच सहभागी शिबीरार्थ्यांचे मनोगत झाले विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शिबिराला यशस्वी करण्यासाठी शीलाताई बोचरे, तुलसीदास सवैय्या, नितिन शाहाकार, राजेश मुंदे, सोहम खडसे, करन वानखड़े, सुमित चांगल यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम चे सूत्र संचालन रोशनी सवैय्या यांनी केले.
Post a Comment