अमरावती :-
ग्राहकहितासाठी ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे .ग्राहकांच्या वैयक्तीक समस्यापेक्षा ग्राहकांच्या सामाजिक तक्रारींवर तळमळीने काम केले पाहीजे, असे निर्देश अध्यक्ष राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी केले .यावेळी उपायुक्त पुरवठा रमेश मावस्कर,जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के वानखडे ,ग्राहक संरक्षण परिषदेचे डॉ.अजय गाडे व सर्व शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
1986च्या ग्राहक संरक्षण कायद्यान्वये ग्राहकांची सुरक्षितता महत्वाची असल्याचे सांगून ते म्हाणाले की, अन्नसुरक्षा कायद्यान्वये खाद्यपदार्थाची शुध्दतेला प्राधान्य दिले पाहीजे. या दृष्ट्रीने अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी घेतली.तसेच वैधमापन कार्यालयातर्फे विक्री होणाऱ्या वस्तुची वजने ,काटे व वेळोवेळी तपासणी करण्याचे व आवेष्टीत वस्तुच्या कायद्याची कठोर अमंलबजावणीचे निर्देशही त्यांनी दिले.वैधमापन कार्यालयातर्फै वजनमापेच्या 207 प्रकरणांची तपासणी केल्याची व 12 लक्ष 93 हजार दंड वसुल केल्याची माहिती सहायक नियंत्रक वैधमापन सुरेश गार्ले यांनी दिली.
पेट्रोलपंपावरील मोफत हवा,पिण्याचे पाणी,महीलांसाठी स्वच्छतागृह बंधनकारक असल्याने जिल्हयातील 104 पेट्रोलपंपाना यासंबंधी पत्र दिल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वानखडे यांनी सांगितले. यावेळी राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग जिल्हा परीषद,पंचायत विभाग जिल्हा परिषद आधी विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाची माहिती त्यांनी घेतली.
जिल्हा ग्राहक कल्याण समितीच्या बैठका नियमीतपणे घेण्यात याव्यात.ग्राहक चळवळीतील सर्व कार्यकर्त्यानी ग्राहक जागरणाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम करण्याची सूचना ही देशपांडे यांनी केली.यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ.अजय गाडे यांची राज्यस्तरीय कल्याण समीतीवर अमरावती विभागातुन सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचा पुष्पगुच्छ देवुन श्री.देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Post a Comment