एज्युकेशनइस्टा शैक्षणिक प्रदर्शनीचे उद्घाटन
शैक्षणिक 40 दालनांचा सहभाग
विविध देशातील शैक्षणिक संस्थाचा सहभाग
शैक्षणिक 40 दालनांचा सहभाग
विविध देशातील शैक्षणिक संस्थाचा सहभाग
नागपूर :- शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या बदलांचा वेध घेतांना ज्या क्षेत्रात करिअर घडवायचे आहे. अशा सर्व क्षेत्रांचा सखोल अभ्यास करुन तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचे माहिती देऊन आपले करिअरची निवडा असे आवाहन श्रीमती अमृता फडणवीस यांनी आज येथे केले.
हॉटेल सेंटर पॉईंट येथे एज्युकेशनइस्टा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील शैक्षणिक संधी व प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना त्या बोलत होते.
हॉटेल सेंटर पॉईंट येथे एज्युकेशनइस्टा द्वारे दोन दिवशीय शैक्षणिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीचे उद्घाटन श्रीमती अृमता फडणवीस यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व फित कापून करण्यात आले.
यावेळी एज्युकेशनइस्टा व फॅशनइस्टाचे व्यवस्थापकीय संचालक पवन शंकर, छत्तीसगढच्या ॲमिटी विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. सत्येंद्र पटनाईक, ओपी जिंदाल विद्यापीठाचे उपसंचालक हेमंत शर्मा, मुंबई गरवारे इन्स्टिटयुटचे संचालक श्रीमती शिल्पा बोरकर, मेघे ग्रुपचे मुख्यकार्यकारी अधिकारी एस.डी भोळे, स्नेह ग्रुपचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्याम शेंद्रे, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ इन्स्टिीटयुटचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, जेडी. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मॅनेजमेंटचे संचालक संजय गोयल व श्रीमती चैताली देशमुख उपस्थित होते.
श्रीमती अमृता फडणवीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज जग तंत्रज्ञानामुळे जवळ आले आहे. यापुढे विद्यार्थ्यांना आपल्या करिअर निवडीसाठी मोठया प्रमाणात वेगवेगळया क्षेत्रात संधी उपलब्ध झाले असून या सुवर्णसंधीचा आजच्या युवकांनी वेळ न गमावता उपयोग करुन घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना वेगवेगळया क्षेत्रात करियर करण्यासाठी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध असून देशातील वेगवेगळया नामांकित क्षेत्रात मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यापुढे म्हणाल्या की, 2020 नंतर रिअल इस्टेट, औद्यागिक क्षेत्र यासारख्या देशातील विविध क्षेत्रामध्ये 1.5 कोटी रोजगार उपलब्ध होणार असून त्यामध्ये मुबलक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनात विविध शैक्षणिक क्षेत्रात करियर करणाऱ्या 40 शैक्षणिक संस्थाचे मार्गदर्शन स्टॉल लावण्यात आले आहे. यात इटली, दिल्ली, मुंबई, बरोडा, सोनपत, कोल्हापुर, पुणे, नागपूर, रायपूर येथील विविध शैक्षणिक संस्था व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

Post a Comment