रिसोड / महेंद्र महाजन जैन -
:-प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय,शाखा रिसोड च्या वतीने व डॉ राधेश्यामजी लढ्ढा यांच्या सहकार्याने लोणी( स.म ) येथे दि १५ मे ते २१मे सात दिवसीय राजयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिराला राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या सुमधुरवाणी व प्रकांड ज्ञानातून प्रवचन करणार आहेत.लोणी येथील लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये डॉ प्रवीण लढ्ढा यांच्या दवाखान्याजवळ सायंकाळी ७ ते८ या नियोजित वेळेत सातही दिवस लोणीसह पंचक्रोशीतील नागरिकांना अध्यात्मिक ज्ञानाचा आत्मिक परिचय करून घेण्याची सेवा घडत आहे.प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचून मानव कल्याणाच्या ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध आहे.या शिबिराला सर्व धर्म-पंथाचे अनुयायी लाभार्थी असू शकतात. या राजयोग शिबिराला उपस्थित राहून अध्यात्मिक ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Post a Comment