गुरूवारी पाणलोट समितीची तातडीची बैठक
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील शेतकरी शुक्रवारी पाणलोट उपजिविका उपक्रमाचा अनुदान न मिळाल्याने कृषी अधिकारी कार्यालयात गेले असता कृषी अधिकारी कार्यालयात एकही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नसल्यामुळे कार्यालयाला कुलुप ठोकले होते. तीन दिवस एकाही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली नव्हती. मात्र अखेर चौथ्या दिवशी सोमवारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कुलुप उघडले असुन शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील श्रमसाफल्य पाणलोट समितीच्या ५० सभासदांनी यांनी प्रत्येक चार हजार आठशे निधीचा सरकारी भरणा केल्यावरही फक्त दहा लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले. उर्वरीत ४० लाभार्थ्यांना कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी निधीसाठी वारंवार चकरा मारण्याकरीता लावत आहे. शेतकऱ्यांनी पसंतीने वस्तु बाजारातुन खरेदी केल्या. व त्याच्या संबंधित पावत्या दिल्या आहे. यानंतर निधी प्राप्त होण्यासाठी पाणलोट समितीचे अामल्याचे अध्यक्ष संजय ठवरे व निरंजन नागरीकर यांना शेतकऱ्यांनी वारंवार विनंती केली. परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच अमरावती येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला असता त्यांनी सुध्दा टाळाटाळाची उत्तरे दिली. या पाणलोट उपजिवीका उपक्रमातील ४० लाभार्थ्यांनी वारंवार मागणी करूनही कृषी अधिकारी कार्यालयातर्फे उपक्रमाचा निधी मिळत नसल्यामुळे शेतकरी शुक्रवारी कृषी कार्यालयात गेले असता तेथे कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयाला शुक्रवारी कुलुप ठोकले होते. तीन दिवस कोणताही अधिकारी वा कर्मचारी चर्चेसाठी आला नव्हता. अखेर सोमवारी तालुका कृषी विभागातर्फे चर्चेचा प्रस्ताव शेतकऱ्यांना पाठविण्यात आला. सोमवारी कुलुप उघडुन बंडुभाऊ यादव, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, अरूणराव बेलसरे यांच्या नेतृत्वात शेतकरी चर्चेसाठी कृषी कार्यालयात गेले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी ठाकरे यांनी उर्वरीत ४० सभासदांचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच तालुका कृषी अधिकारी पाणलोट समितीची गुरूवारी आमला येथे तातडीने सभा घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढणार आहे. याव्यतीरीक्त कामामध्ये दिरंगाई करीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे टेबल अदलाबदली करणार असल्याचेही सांगितले.
यावेळी संजय वानखडे, पांडुरंग सांधेकर, पुंडलीक श्रीखंडे, शेषराव बनकर, देविदास निकरे, गोपाल श्रीखंडे, मारोती बोरघरे, सुरेंद्र विलेकर, प्रकाश नागरीकर, ज्ञानेश्वर वासनकर, सुदाम साहारे, संजय डंबारे, पांडुरंग भगत, राजेंद्र बकाले, नामदेव लांडगे, वामनराव हेरोडे, पांडुरंग विलेकर, अनिल बकाले, अरविंद डोंगरे, सुधीर डोंगरे, संजय बकाले, रमेश बनसोड, रामराव ढोक आदी शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
Post a Comment