अचलपुर / श्री प्रमोद नैकेले /-
नगर परिषद अचलपुर च्या नवनिर्वाचित अध्यक्षा सुनीता नरेंद्र फिसके तर्फे जात वैधता प्रमाण पत्र अाजपर्यंत उपलब्ध करून दिले नाही त्यामुळे त्यांचे पद धोक्यात आले आहे.जात प्रमाण पत्र सहा महिन्यात सादर करण्याचे नियमात प्रावधान आहे परंतु सहा महीन्याची कालावधी संपल्यावर सुध्दा सुनीता फिसके यांनी जात वैधता प्रमाण पत्र उपलब्ध करून दिले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चेला पेव फुटले आहे. उल्लेखनीय हे की नगर परिषद अचलपुर अध्यक्ष पदाकरीता झालेल्या निवडणुकीत सुनीता फिसके व सरवत अंजुम यांच्यात कांट्याची टक्कर झाली परंतु केवळ 550 मताच्या फरकाने शिवसेना च्या उमेदवार म्हणून सुनीता फिसके विजय झाल्या अतिशय कमी मतांनी पराभव झाल्याचे घटनेला सरवत अंजुम विसरल्या नाहीत जेंव्हा केंव्हा असा प्रसंग येतो त्याचा फायदा घेण्याचे दृष्टीने सरवत अंजुम यांना संधी चालून आली.फीसके निवडणूक जिंकल्यावर आजपर्यंत जात वैधता प्रमाण पत्र जमा करू शकल्या नाहीत हे कळताच सरवत अंजुम यांनी या संबंधात माहिती प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नियमानुसार पर्याप्त माहिती प्राप्त होताच सरवत अंजुम यांनी विद्यमान अध्यक्षा सुनीता फिसके च्या जात प्रमाण पत्र ला आवाहन देवून टाकले. शुक्रवार दिनांक 09/06/2016 ला सरवत अंजुम यांनी अापले वकील अॅड.आबिद हुसैन च्या माध्यमातून निवडणूक आयोगा समक्ष सुनीता फिसके यांना अपात्र करण्याचे हेतुने याचिका दाखल केली याचिकेमध्ये सरवत अंजुम चे वकील अॅड.आबिद हुसैन यांनी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1956 च्या नियमानुसार म्हटले आहे की निवडणूक जींकल्या नंतर 6 महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्याची जबाबदारी निवडून आलेल्या उमेदवाराची आहे. 26 नोव्हेंबर 2016 ला अचलपूर पालिका अध्यक्ष पदाची निवडणूक जींकल्यानंतर आजपर्यंत सुनीता फिसके यांनी आपली जात वैधता प्रमाण पत्र आयोगाकडे जमा केले नाही.वरील याचिकेमध्ये विविध नियमांचे दाखले सुध्दा देण्यात आले. सुनीता नरेंद्र फिसके ला अध्यक्ष पदावरून अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे. जानकारांच्या मते सुनीता नरेंद्र फिसके चे अध्यक्ष पद धोक्यात येऊ शकते असे आहे. सरवत अंजुम मो साजिद फुलारी चे वकील आबिद हुसेन यांनी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये सुध्दा तक्रार दिली आहे. तक्रार कर्ता सोबत संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की सुनीता फिसके नाशिक जिल्हाची रहिवासी आहे व आजपर्यंत त्यांनी वेळ असूनही जाती प्रमाण पत्र समिति मार्फत जात प्रमाणपत्र वैधतेकरीता सादर केले नाही.या कारणाने आम्ही निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात नगराध्यक्ष पद वरून सुनीता फिसके यांनाअपात्र घोषित करण्याची मागणी करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेही अचलपुर नगराध्यक्ष पद नेहमी वादग्रस्त राहिले आहे. सचिन देशमुख,रफिक सेठ, लक्ष्मी वर्मा व नंदवंशी पर्यंत ही परेशानी कायम सुरू आहे आज सुनीता फिसके यांचे जाती प्रमाणपत्र ला घेऊन याचिका दाखल करण्यात आली आहे.त्यामुळे जुळ्या शहरात राजकीय गोटात भुकंपजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सर्वांचे लक्ष आता निवडणूक आयोगाकडे लागले आहे की आयोग यावर काय निर्णय देते मात्र शहरात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.
Post a Comment