चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान)
तालुक्यात १० जून रोजी शहरासह काही परीसरात दुपारपासुन ते सायंकाळी पर्यंत जोरदार पाऊस पडला. पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली. यामुळे काही वेळ विद्युत पुरवठा सुध्दा खंडित झाला.
चांदुर रेल्वे शहरात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपासुन सायंकाळी पाऊस सुरूच होता. शहर व परिसरात दुपारी ऊन पडले होते. अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे काही वेळ वीज पुरवठा खंडित झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या दमदार आगमनाबाबत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मृग नक्षत्रावर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, बियाणे, खते खरेदी करण्याची लगबग वाढणार आहे. वृत्तलिहोस्तर पाऊस सुरूच होता.
Post a Comment