मुंबई-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'वस्तू आणि सेवा कर (जी.एस.टी.) कायदा' याविषयासंदर्भात वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मुलाखत प्रसारित होणार आहे.
विविध राज्यांतील वेगवेगळे कर आता संपुष्टात येवून जीएसटी मुळे देशभरात एकच कर लागू राहून देशभरात समान करपद्धती अमंलात येईल. जीएसटी या करप्रणालीची वैशिष्ट्ये, महाराष्ट्रसाठी ही करप्रणाली कशी हितकारक आहे. या संदर्भात सविस्तर माहिती श्री. मुनगंटीवार यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दिली आहे.
ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दिनांक १३ जून २०१७ रोजी सायंकाळी ७:३० ते ८:०० या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदक योगशे कोलते यांनी घेतली आहे.
Post a Comment