Saturday, June 17, 2017
किन्हीराजा येथील मुख्य रोडवरील पुल बनला धोकादायक - ग्रामपंचायत प्रशासन कुंभकर्णी झोपेत
Posted by vidarbha on 8:33:00 AM in | Comments : 0
महेन्द्र महाजन - रिसोड/वाशिम
मालेगांव :- किन्हीराजा ग्रामपंचायत समोरील मुख्यमार्गावरील पुलाची अत्यंत दुरावस्था झाली असुन पुलाचे कठडे पूर्णता जमिनदोस्त झाले असुन गावामध्ये प्रवेश करण्यासाठी हाच एक मुख्य मार्ग अाहे त्याच बरोबर जलयुक्त शिवार अभियान मार्फत नाला रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे कामे अर्धवट असल्यामुळे नाल्याचे पाणी पूर्णता पुलाच्या वरून जात असल्यामुळे पुलाचे कठडे वाहुन जात असल्यामुळे येजा करनार्या ग्रामस्थांना अरुंद पुलावरुन पाणिचालु असतांना जिव मुठीत धरुनच पुल पार करावा लागत आहे पुलअरूंद असल्यामुळे दुचाकी स्वार व येजा करणारे किन्हीराजा परीसरातील ग्रामस्थ सुद्धा जख्मी झालेले आहे तरी सुध्दा संबंधित प्रशासन जागे झालेले नाही याच पलावरुन नाल्याच्या काठावरील विजेचा खांब पुर्णता वाकल्यामुळे त्याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या अगोदरही पुलाची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी निवेदने देऊन सुध्दा संबंधीत प्रशासनाने कानाडोळा करीत झोपेचे सोंग घेतल्याचे बोलल्या जात आहे .एखादा मोठा अपघात झाल्यावरच जाग येणार का ???? असा प्रश्न किन्हीराजा ग्रामस्थांना पडला आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment