BREAKING NEWS

Saturday, June 17, 2017

....आणि बाबांनी मला झेलले - रसिका सुनील, अभिनेत्री



माझे बाबा सुनील धबडगावकर म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यांच्याबद्दल जेवढे काही बोलू तेवढे कमी आहे. माझ्या कामाचे कोडकौतुक त्यांना खूप असते. माझ्या आगामी 'बसस्टॉप' सिनेमाची एक्साईटमेंट माझ्यापेक्षा अधिक त्यांना आहे. मी लहानपणापासूनच शांत स्वभावाची मुलगी आहे. पण कधी कधी खूप अतरंगीपणा करायचे,  असे बाबाच बोलतात. फादर्स डे निमित्ताने एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते, माझ्या लहानपणीचा एक किस्सा त्यांनीच मला सांगितला होता. तो असा कि,  मी, आई आणि बाबा डोंबिवली स्टेशनला होतो, त्यावेळी खुप धो-धो पाऊस पडत होता.. रेल्वे स्थानकावर खुप गर्दी असल्यामुळे सर्वजण आपापली छत्री संभाळत चालत होते. पाऊस जास्त असल्यामुळे बाबांनी मला खादंयावर घेतलं होत, मात्र तिथे देखील मला स्टंटबाजी करायची शक्कल सुचली आणि बाबांच्या खांद्यावरुन भरपावसात मी उसळी मारली,  बाबांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला पण मी सटकले, तेवढ्यात त्यांनी छत्री उलटी केली आणि मला छत्रीत झेलंल... अक्षरशः पडता पडता मी वाचले होते, त्यानंतर बाबांनी पुन्हा मला त्यांच्या खांदयावर पकडून बसवलं. खूप भन्नाट किस्सा होता तो. मात्र आता जसजशी मोठी होत गेली, स्वतःमध्ये बदल घडवत गेली. मागच्या चुका सुधारत गेली, आणि माझ्या या सर्व धडपडीच्या प्रवासात ते मला सांभाळत आले आहेत, आणि आज देखील तितक्याच तत्परतेने मला सांभाळत आहेत. 


Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.