अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर जुळ्या शहरातील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते हरीश्चंद्र मुगल यांनी नुकताच जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे सुपूर्द केला.याबद्दल त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज घोषणा केली.
आज देशात काँग्रेसचे पानीपत झाल्याचे दिसत आहे अशा परिस्थितीत अनेक दलबदलू पक्षाला सोडून स्वार्थ साधण्यासाठी चालत्या गाडीचे प्रवाशी बनत आहेत.अश्याही परिस्थितीत काही निष्ठावंत काँग्रेस पक्षासोबत राहुन आपल्या निष्ठेने कार्य करीत आहेत पण जिल्हा स्तरीय काही पक्षनेते अश्या निष्ठावंताचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत पक्षाला रामराम ठोकत असल्याचे अचलपूर या ऐतिहासिक व काँग्रेसच्या एका काळातील बालेकील्यात घडत असल्याचे दिसत आहे.येथील निष्ठावंत व जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष हरीश्चंद्र मुगल यांनी जिल्हा ब्लाक काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली आपल्या विलायतपुरा विभागात उपसभापती विधानपरीषद महाराष्ट्र राज्य माणिकराव ठाकरे यांच्या स्थानिक विकासनीधीतून महाराष्ट्राचे आराध्य बळीराजा यांचे दैवत बैलजोडीची स्थापना करून पोळा चौकाचे सौदर्यीकरणाचा लोकार्पन सोहळा 14 जुन रोजी ठेवण्यात आले याकरिता प्रमुख अतिथी स्वतः बबलू देशमुख व उदघाटक माणिकराव ठाकरे हे होते.त्यांना निमंत्रण पत्रिका दाखवून व वेळोवेळी उपसभापती यांच्या सुवीधेनुसार सर्व त्यांचा होकार व विश्वासात राहून ठरवण्यात आले व आपल्या पक्ष श्रेष्ठींच्या व पक्षाच्या प्रतीष्ठेला ठेस पोहचणार नाही याची काळजी घेऊन भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मात्र ऐनवेळेस जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांनी काहीच सुचना न देता माणिकराव ठाकरे यांनी व स्वतः सुध्दा या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून एक तर शेतक-यांचा अपमान केला तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचवून पक्षाचे व कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.असे हरीश्चंद्र मुगल यांनी म्हटले त्यांनी याप्रसंगी आपण आपल्या अन्नदात्या वसुधाताईंच्या सोबत काम करतांना व त्यानंतर बबलू देशमुख यांना पक्षाने उमेदवारी दिली असता त्यांचेही एकनिष्ठेने काम केले अतीशय बिकट परिस्थितीत अचलपूर नगरपालीकेवर अरूणभाऊ वानखडे यांना नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साथ देवून पक्षांचा झेंडा तालुक्यात फडकवला एवढे करूनही पक्षाचे
जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांनी स्वार्थी भावणेने एका विशिष्ट समाजाच्या दबावात येवून अडचणीत असलेल्या शेतकरी व 40 जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ बैल जोडी ची प्रतिमा उभारूण पोळा चौकाच्या सौदर्यीकरण लोकार्पन सोहळ्यामध्ये उपस्थित न राहून शेतकरी व जेष्ठ नागरिकांचा अपमान केला शिवाय निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले त्यामुळे आपण जिल्हा सेवादल अध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण,चंद्रकांतजी दायमा व बबलू देशमुख या आपल्या पक्ष श्रेष्ठींना 15 जून रोजी पाठवला आहे पक्षाच्या आदेशानुसार आपण पक्षाचे कार्य करीत राहू परंतू अध्यक्ष म्हणून आपण राहणार नाही तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते याबद्दल काय निर्णय घेतील हा त्यांचा प्रश्न आहे आपण मात्र आपला वैयक्तिक व पदाचा राजीनामा दिला आहे.सध्या पक्षाचे कार्य करीत राहू पण असेच होत राहिले तर आपल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेनूसार पुढील निर्णय घेतला जाईल असे त्यांनी घोषित केले याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरपालिका उपाध्यक्ष अजय लकडे,विजय टेंभरे,नगरसेवक सुरेश क्षीरसागर,रामेश्वर हुड,गंगाधर कडू,निकेश दाभाडे,पंजाबराव मोहोड,मंगेश व-हेकर,प्रमोद कांबळे व असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.

Post a Comment